Lok Sabha Session: 18 व्या लोकसभेत शेतकऱ्यांचीच हवा! जाणून घ्या काय आहेत 542 खासदारांचे व्यवसाय

Newly Elected MP: 18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. सर्व खासदार आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. लोकसभेचे पहिले अधिवेशन ३ जुलैपर्यंत चालणार आहे.
Business Of Newly Elected MPs of 18th Lok Sabha
Business Of Newly Elected MPs of 18th Lok SabhaEsakal
Updated on

18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. सर्व खासदार आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. लोकसभेचे पहिले अधिवेशन ३ जुलैपर्यंत चालणार आहे.

दरम्यान, यंदाच्या लोकसभेत 280 खासदार असे आहेत जे पहिल्यांदा निवडून आले आहेत. खासदारांच्या व्यवसायाविषयी बोलायचे झाले तर बहुतेक खासदारांचा व्यवसाय हा शेती आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभेत शेतकरी असलेल्या खासदारांचीच हवा असणार आहे.

18 व्या लोकसभेत हृदयरोग तज्ञ आणि प्राध्यापकांपासून ते अभिनेते आणि क्रिकेटपटूंपर्यंतच्या खासदारांचा समावेश आहे.

17व्या आणि 18व्या लोकसभेत शेती, समाजसेवक आणि व्यवसाय हा आपला व्यवसाय आहे असे सांगितलेल्या खासदारांची संख्या सर्वाधिक असल्याचे लोकसभेच्या संकेतस्थळावर नमूद केले आहे.

179 खासदार शेतकरी

शेती आपला व्यवसाय आहे असे सांगणाऱ्या खासदारांची संख्या 179 इतकी आहे. मात्र, गेल्या लोकसभेच्या तुलनेत यावेळी शेतकरी असलेल्या खासदारांची संख्या 8 टक्क्यांनी घटली आहे.

गेल्या लोकसभेत 230 खासदारांचा व्यवसाय शेती होता. दरम्यान, भाजपचे सर्वाधिक खासदार कृषी क्षेत्राशी संबंधित आहेत. भाजपचे 240 पैकी 79 खासदार शेतीशी निगडीत आहेत. यानंतर काँग्रेसचे 99 पैकी 29 खासदार, समाजवादी पक्षाचे 37 पैकी 23, तृणमूल काँग्रेसचे 29 पैकी दोन आणि द्रमुकचे 22 पैकी 9 खासदार शेतीशी संबंधित आहेत.

Business Of Newly Elected MPs of 18th Lok Sabha
Bhartruhari Mahtab: बीजेडी सोडून भाजपमध्ये आले अन् लोकसभेचे हंगामी अध्यक्ष झाले, कोण आहेत भृतहरि महताब

70 खासदारांचा व्यवसाय राजकारण

नवीन सभागृहात उद्योजक असलेल्या खासदारांची संख्या 100 आहे. मात्र, हा आकडाही गेल्या वेळेपेक्षा कमी आहे. गेल्या वेळी 144 खासदार उद्योजक होते. यावेळी 18 व्या लोकसभेत 39 वकील खासदार म्हणून निवडून आले आहेत. 28 खासदार वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत आहेत.

नव्या लोकसभेत 70 खासदार असे आहेत ज्यांनी राजकारण हा आपला व्यवसाय असल्याचे जाहीर केले आहे. चित्रपट, टीव्ही आणि संगीत उद्योगाशी संबंधित खासदारांची संख्याही यावेळी घटली आहे. गेल्या वेळी त्यांची संख्या 22 होती, यावेळी ती कमी होऊन 12 झाली आहे.

Business Of Newly Elected MPs of 18th Lok Sabha
Mayawati Successor: मायावतींनी भाच्याला संधी देण्यामागे 'चंद्रशेखर आझाद' फॅक्टर? वाचा पुनरागमनाची इनसाईड स्टोरी!

115 खासदार समाजसेवक

18 व्या लोकसभेत 115 खासदार किंवा सभागृहात 21.22% खासदार आहेत ज्यांचा व्यवसाय सामाजिक कार्य आहे. मागील लोकसभेच्या तुलनेत सामाजिक कार्यकर्त्यांच्या संख्येत 13.13 टक्क्यांनी घट झाली आहे, ज्यामध्ये 192 खासदार किंवा 34.35% सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.