Business Success Story: फिजिक्समध्ये नापास झाली, शिक्षकांनी टोमणे मारले....अन् ती बनली फ्लाईंग बोट बनवणारी आघाडीची उद्योजिका

संप्रीति यांनी सांगितलं की, ५४० इमेलपैकी प्रत्येक मेलमध्ये मी त्यांना सांगितलं होतं की मी काय काय करू शकते. त्यापैकी फक्त ४ जणांनी उत्तर दिलं आणि शेवटी फक्त एकाच कंपनीने काम दिलं.
Sampriti Bhattacharya
Sampriti BhattacharyaSakal
Updated on

कोलकत्त्यामध्ये राहणाऱ्या संप्रीति भट्टाचार्य शाळेत असताना एक सामान्य विद्यार्थिनी होत्या. एवढंच नव्हे, त्या फिजिक्समध्ये नापास झाल्या होत्या, त्यावेळी त्यांच्या शिक्षकांनी त्यांना गृहिणी होण्याचा सल्ला दिला होता. पण हीच सामान्य विद्यार्थिनी आज फ्लाईंग बोट बनवणारी एक यशस्वी उद्योजिका आहे.

३६ वर्षीय संप्रीति नेवियर या संस्थेच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. या कंपनीची नेवियर ३० ही इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल बोट समुद्री उद्योगाच्या क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडवत आहे. ही जगातली सर्वात लांब पल्ल्याची आणि अमेरिकेतली पहिली पूर्णपणे इलेक्ट्रिक हायड्रोफॉयलिंग बोट असल्याचा दावा केला जातो.

Sampriti Bhattacharya
Business Sector in India: देशातली सगळ्या जुनी कंपनी; आज बाजारात महत्त्वाचं स्थान; पाकिस्तानशीही आहे संबंध

एनएएस डेलीसोबत बोलताना संप्रीति यांनी सांगितलं की, त्यांच्या विद्यार्थीदशेत त्यांना फिजिक्स हा विषय आवडत होता. त्यामुळे त्यांनी आपलं अपयश किंवा शिक्षकांची बोलणी यांचा स्वतःवर प्रभाव पडू दिला नाही. त्या सांगतात की, माध्यमिक विद्यालयात असताना मी गणितात फार हुशार नव्हते. शिक्षकांना वाटलं की मी गृहिणी होणं किंवा एखादी छोटी नोकरी करणं माझ्यासाठी योग्य ठरेल.

२० वर्षांची असताना संप्रीति यांनी ५४० कंपन्यांमध्ये इंटर्नशिपसाठी अर्ज केले आणि त्यांना अमेरिकेमध्ये एका पार्टिकल फिजिक्स प्रयोगशाळेमध्ये नोकरी मिळाली. मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, संप्रीति यांनी सांगितलं की, ५४० इमेलपैकी प्रत्येक मेलमध्ये मी त्यांना सांगितलं होतं की मी काय काय करू शकते. त्यापैकी फक्त ४ जणांनी उत्तर दिलं आणि शेवटी फक्त एकाच कंपनीने काम दिलं, तेही इंटर्नशिप. (Business News)

Sampriti Bhattacharya
Business Idea :  या तरूणानं प्लास्टिक वेस्टवर शोधलाय जबरी फंडा; चहा प्या आणि कप जणावरांना खायला घाला

यानंतर संप्रीति रिसर्च असिस्टंट म्हणून शिकागो इथं गेल्या. त्या म्हणाल्या की, तेव्हाच त्यांना विज्ञानाची गोडी लागली. त्यांनी नासामध्ये आणखी एकदा इंटर्नशीप केली. त्यानंतर त्यांनी ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीमधून मास्टर्स डिग्री आणि एमआयटीमधून पीएचडी केली. त्यानंतर त्या सॅन फ्रान्सिस्कोला गेल्या आणि १२ मिलियन डॉलर गोळा करून बोट बनवण्यासाठी एक टीम जमवली.

२०१६ मध्ये त्यांना फोर्ब्सकडून जगातल्या पहिल्या ३० सर्वात शक्तिशाली युवा चेंजर्सच्या यादीमध्ये समाविष्ट कऱण्यात आलं होतं. संप्रीति म्हणाल्या की, गेल्या १३ वर्षांमध्ये मी खूप काही शिकले. यातून मला कोणत्याही प्रकारच्या संकटांना सामोरं जाण्याचा आत्मविश्वास मिळाला.

Sampriti Bhattacharya
Business Success Story: काच कापण्याचं काम करणाऱ्या मुलीने उभारला ४० हजार कोटींचा व्यवसाय

फ्लाईंग बोट कशी आहे?

नेवियर ३० या फ्लाईंग बोटचं डिझाईन विमानासारखं आहे. या बोटीत पाण्यामधल्या भागामध्ये तीन पंख आहेत. जेव्हा बोट वेगाने चालते, तेव्हा हवेमुळे ही बोट लाटांच्या वर येते. अशा पद्धतीने फक्त फास्ट आणि जास्त ताकदीनेच नव्हे तर कोणताही आवाज न करता चालते. स्टार्टअप N30 चं एक नाव 'द बोट ऑफ द फ्युचर' असंही आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()