Andrea Wojnar(UNFPA) : देशात २०५० पर्यंत ज्येष्ठ होणार दुप्पट;‘युएनएफपीए’च्या भारतातील प्रमुख ॲंड्रिया वोजनार यांची माहिती

जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेला भारत तरुणांचा देश’ म्हणूनही ओळखला जातो. मात्र, २०५० पर्यंत भारतातील ज्येष्ठांची संख्या दुप्पट होणार असल्याचे युनायटेड नेशन्स फंड फॉर पॉप्युलेशन ॲक्टिव्हिटीज (युएनएफपीए)च्या भारतातील प्रमुख ॲंड्रिया वोजनार यांनी सांगितले.
Andrea Wojnar(UNFPA)
Andrea Wojnar(UNFPA) sakal
Updated on

नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेला भारत तरुणांचा देश’ म्हणूनही ओळखला जातो. मात्र, २०५० पर्यंत भारतातील ज्येष्ठांची संख्या दुप्पट होणार असल्याचे युनायटेड नेशन्स फंड फॉर पॉप्युलेशन ॲक्टिव्हिटीज (युएनएफपीए)च्या भारतातील प्रमुख ॲंड्रिया वोजनार यांनी सांगितले. ज्येष्ठांसाठी, विशेषत: दारिद्र्याचा सामना करणाऱ्या एकाकी महिलांसाठी आरोग्यसुविधा, गृहप्रकल्प आणि निवृत्तिवेतन आदींत गुंतवणूक करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. ११ जुलैला झालेल्या जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त त्यांनी ‘पीटीआय’ला मुलाखत दिली.

शाश्वत विकासाला गती देण्यासाठी भारत प्राधान्य देत असलेला लोकसंख्येच्या प्रमुख ट्रेंडची रूपरेषाही त्यांनी अधोरेखित केली. यात युवकांची संख्या, ज्येष्ठांचे प्रमाण, शहरीकरण, स्थलांतर, हवामान बदल आदींचा समावेश असून यातील प्रत्येक घटकाने देशापुढे अनोखी आव्हाने आणि संधी निर्माण केल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, की २०५० पर्यंत ६० वर्षांवरील व्यक्तींची संख्या दुप्पट होऊन ३४. ६ कोटींवर पोचेल. त्यामुळे, ज्येष्ठांसाठी आरोग्यसुविधा, गृहप्रकल्प, निवृत्तिवेतन आदींची गरज वाढत आहे.

भारतात १० ते १९ वयोगटातील व्यक्तींची संख्या २५.२ कोटी इतकी आहे. त्यामुळे, लिंग समानतेबरोबरच आरोग्य, शिक्षण, रोजगार आदींत गुंतवणूक केल्यास या लोकसंख्येच्या क्षमतेला वाव मिळून देश शाश्वत विकासाकडे पावले टाकू शकतो. २०५० पर्यंत देशातील निम्मी लोकसंख्या शहरी असण्याचा अंदाज असून झोपडपट्ट्यांची वाढ तसेच प्रदूषण रोखण्यासाठी भक्कम पायाभूत सुविधा, परवडणारी घरे अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले. शहरी नियोजनात महिलांची सुरक्षितता व आरोग्यसुविधा तसेच लिंग समानतेसाठी शिक्षण व रोजगाराची गरज तसेच जीवनाचा एकूण दर्जा उंचावण्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

साडेसात टक्के प्रसूती अनियोजित

राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमाची अंमलबजावणी करणारा भारत जगातील पहिला देश आहे. देशाने यात लक्षणीय प्रगती केली असली तरी काही आव्हाने शिल्लक आहेत. २०१९-२० च्या आकडेवारीनुसार कुटुंब नियोजनाच्या ९.४ टक्के गरजा पूर्ण होत नाहीत आणि ७.५ टक्के प्रसूती अनियोजित असतात. त्यामुळे, कुटुंब नियोजनांच्या साधनांची उपलब्धता वाढविण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. युएनएफपीएने २०२३ मध्ये भारतातील दहा राज्यांत एक लाख सिंगल रॉड सबडर्मल इम्प्लांट्‌स आणि अंतरा-एससीचे दोन लाख डोसचे वितरण केले आहे. ही दीर्घकाळ टिकणारी गर्भनिरोधके विलंबाने गर्भधारणा करू इच्छिणाऱ्या जोडप्यासाठी आदर्श आहेत, असेही ॲंड्रिया वोजनार म्हणाल्या.

प्रमुख निरीक्षणे

  • स्थलांतराचे व्यवस्थापन करण्यासाठी सूक्ष्म नियोजन, कौशल्य विकास व आर्थिक संधीची आवश्यकता

  • हवामान बदलाचा प्रजनन आरोग्यावरही विपरीत परिणाम, प्रसूतीतील गुंतागुंतीत वाढ

  • लिंग समानता व शाश्वत विकासासाठी महिलांशी संबंधित समस्या सोडविण्याची गरज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.