K Kavitha: मुख्यमंत्र्यांच्या लेकीच्या ईडी चौकशी पूर्वी तेलंगणात झळकले 'Bye Bye Modi' चे poster

मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी के कविता यांची दिल्ली दारू धोरण प्रकरणी ईडी आज चौकशी करणार
poster
posterEsakal
Updated on

तेलंगणतील भारत राष्ट्र समितीचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी के कविता यांची दिल्ली दारू धोरण प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (आज) शनिवारी चौकशी करणार आहे. याच प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना तपास यंत्रणेने अटक केली आहे.

दरम्यान, या चौकशीपूर्वीच तेलंगणातील हैदराबाद येथे जोरदार पोस्टरबाजी दिसून येत आहे. हैदराबाद येथील विविध ठिकाणी 'Bye Bye Modi' चे पोस्टर दिसून आले आहेत. या पोस्टरवरती इतर पक्षांतून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या नेत्यांचे फोटो लावण्यात आले आहेत.

लावण्यात आलेल्या या पोस्टरवर महाराष्टातील नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश राज्यातील नेत्यांचेही फोटो आहेत. ज्यामध्ये हे नेते भाजपमध्ये गेल्यावर कसे बदलले आहेत हे त्यांच्या अंगातील भगव्या शर्टच्या माध्यमातून दाखवण्यात आलं आहे.

poster
Hasan Mushrif : शरद पवारांचा विश्वासू नेता अडचणीत; भल्या पहाटे मुश्रीफांच्या घरावर ED नं का टाकली धाड?

बीआरएसच्या नेत्या आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री सी चंद्रशेखर राव यांच्या कन्या के कवीता यांना गुरुवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर रहायचे होते. मात्र,संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. त्यात महिला आरक्षण विधेयक सादर करायचे असल्यामुळे त्यांनी चौकशीसाठी शुक्रवारी हजर राहणार असल्याचं म्हटलं होतं. ज्याला ईडीने संमती दर्शवली होती. दरम्यान, आज त्यांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ईडीने शुक्रवारी न्यायालयाला माहिती देताना सांगितले की, उत्पादन शुल्क धोरण तयार करण्यामागे एक षडयंत्र आहे. हे षडयंत्र विजय नायर यांच्यासह इतरांनी रचले होते. घाऊक विक्रेत्यांना असाधारण आणि नफ्यासाठी उत्पादन शुल्क धोरण आणले होते असे ईडीने न्यायालयाला सांगितले आहे. याबाबतचे वृत्त एएनआयने आपल्या वृत्तात दिले आहे. विजय नायर आणि बीआरएस नेते के कविता यांच्या भेटीबाबत ई़डीने न्यायालयाला माहिती दिली आहे.

poster
Crime Story : विकृतीचा कळस! १५ वर्षांचा कट, शिक्षिकेचे अपहरण, ५३ दिवस घेतला बदला...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.