नवी दिल्ली : सहा राज्यातील सात विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी होणार आहे. या निवडणूकीत पाच जागा विरोधकांच्या इंडिया आघाडीने एकत्र येत लढल्या आहेत. या वर्षाच्या अखेरीस पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांपूर्वी आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) विरुद्ध विरोधकांच्या इंडिया आघाडी यांच्यातील लढत म्हणून पाहिले जात आहे.
सहा राज्यांतील विधानसभेच्या सात जागांसाठी शुक्रवारी पोटनिवडणूकीची मतमोजणी सुरू होणार आहे. सकाळी ८ वाजता संबंधित राज्यांतील केंद्रांवर मतमोजणी सुरू होईल. उत्तर प्रदेश, केरळ, झारखंड, पश्चिम बंगाल, उत्तराखंड या ठिकाणी प्रत्येकी १ तर त्रिपुरातील २ जागांसाठी पोटनिवडणूक झाली होती.
उत्तराखंडमधील बागेश्वर , उत्तर प्रदेशातील घोसी , केरळमधील पुथुपल्ली, पश्चिम बंगालमधील धुपगुरी , झारखंडमधील डुमरी आणि त्रिपुरातील बॉक्सानगर आणि धनपूर या सात जागांसाठी ५ सप्टेंबर रोजी मतदान झाले होते.
सात जागांपैकी तीन (धानपूर, बागेश्वर आणि धुपगुरी) भाजपकडे आणि प्रत्येकी एक समाजवादी पार्टी (घोसी), सीपीआय(एम) (बॉक्सनगर), जेएमएम (डुमरी) आणि काँग्रेस (पुथुपल्ली) यांच्याकडे होती. आता या सात जागांवर काय निकाल लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सात जागांच्या पोटनिवडणुकीतील लढती
1. उत्तर प्रदेशातील घोसी पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीकडून जोर लावण्यात आला. घोसी येथे ५०.७७ टक्के मतदान झाले असून समाजवादी पक्षाचे (एसपी) आमदार आणि भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केलेले ओबीसी नेते दारा सिंह चौहान यांच्या राजीनाम्यामुळे घोसी जागा रिक्त झाली होती.
2. झारखंडच्या डुमरीमध्ये २.९८ लाख मतदारांपैकी एकूण ६४.८४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक आयोगाने गिरीडीह जिल्ह्यातील पचंबा येथील कृषी बाजार समिती येथे मतमोजणी केंद्र स्थापन केले आहे. या जागेवर झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) च्या बेबी देवी आणि एजेएसयू पक्षाच्या यशोदा देवी यांच्यात मुख्य लढत होणार असल्याचे सांगितले जात आहे.
यादरम्यान २०१९ मध्ये चौथ्या क्रमांकावर आलेल्या एआयएमआयएमचे अब्दुल रिझवी यांनी देखील या निवडणूकूत जोर लावला आहे. या निवडणूकीत इंडिया आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेस आणि RJD यांचा पाठिंबा JMM ला होता, तर AJSU पक्षाच्या यशोदा देवी यांना NDA मधील भाजपने पाठिंबा दिला होता.
3. उत्तराखंडमधील बागेश्वर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी १३० मतदान कर्मचार्यांसह १४ टेबलवर केली जाईल, असे जिल्हा दंडाधिकारी अनुराधा पाल यांनी सांगितले. या वर्षी एप्रिलमध्ये आमदार आणि कॅबिनेट मंत्री चंदन राम दास यांच्या निधनानंतर बागेश्वरची जागा रिक्त झाली होती. २००७ पासून ते चार वेळा या जागेवर विजयी झाले होते.
4. त्रिपुरामध्ये बॉक्सानगर आणि धनपूर या दोन्ही जागांसाठी सोनमुरा मुलींच्या एचएस स्कूलमध्ये मतमोजणी होईल. बोक्सानगरमधून गेल्या विधानसभा निवडणुकीत अयशस्वी झालेले भाजपचे तफज्जल हुसेन हे त्याच जागेवरून माकपचे उमेदवार मिझान हुसेन यांच्याविरुद्ध लढत आहेत. बुधवारी, CPI(M) ने मतदानादरम्यान दोन मतदारसंघात मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाल्याचा आरोप करत मतमोजणीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.
5. पश्चिम बंगालमधील धुपगुरीमध्ये, ज्यामध्ये विधानसभा आणि पंचायत निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. दरम्यान विधानसभा पोटनिवडणूकीत सुमारे ७६ टक्के मतदान झाले. सीपीआय(एम)चे ईश्वरचंद्र रॉय हे काँग्रेस-डाव्या आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत, तर सत्ताधारी टीएमसीने शिक्षक असलेल्या निर्मल चंद्र रॉय यांना उमेदवारी दिली आहे. काही वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानाची विधवा तापसी रॉय यांना भाजपने तिकीट दिले होते. भाजपचे विद्यमान आमदार बिशू पदा रे यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती.
6. काँग्रेसचे दिग्गज नेते ओमन चंडी यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी UDF आणि LDF यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळाली. केरळमधील पुथुपल्ली देखील निकालाची देखील लोक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. 5 सप्टेंबर रोजी झालेली पोटनिवडणूक ही राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही आघाड्यांसाठी प्रतिष्ठेची लढाई होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.