CAA कायदा लागू होणार, हिम्मत असेल तर रोखून दाखवा; भाजप नेत्याचं ममता बॅनर्जींना थेट चॅलेंज

'लोकशाही पद्धतीनं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मी माजी मुख्यमंत्री करीन.'
Suvendu Adhikari vs Mamata Banerjee
Suvendu Adhikari vs Mamata Banerjeeesakal
Updated on
Summary

'लोकशाही पद्धतीनं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मी माजी मुख्यमंत्री करीन.'

पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी काल मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना (Mamata Banerjee) राज्यातील नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची (CAA) अंमलबजावणी थांबवून दाखवा, असं खुलं आव्हान केलंय.

उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील ठाकूरनगर इथं झालेल्या सभेत शुभेंदू अधिकारी म्हणाले, 'ठाकूरनगर हे मतुआबहुल क्षेत्र आहे आणि या समाजाची मुळं बांगलादेशात आहेत. आम्ही सीएए कायद्याबद्दल अनेकदा बोललो आहोत. राज्यात CAA लागू होणार आहे. तुमच्यात हिम्मत असेल तर त्याची अंमलबजावणी थांबवून दाखवा, असं आव्हान त्यांनी मुख्यमंत्री बॅनर्जींना केलंय.

Suvendu Adhikari vs Mamata Banerjee
Baba Ramdev : स्त्री-पुरुष असा भेदभाव कधीच नव्हता; महिलांबाबत वादग्रस्त बोलणाऱ्या बाबा रामदेवांचा यू-टर्न?

ठाकूरनगरमध्ये मतुआ समुदायाला (Matua Community) संबोधित करताना शुभेंदू अधिकारी पुढं म्हणाले, कायद्यात कोणाचंही नागरिकत्व हिरावून घेण्याची तरतूद नाही. येत्या काही दिवसांत पश्चिम बंगालमध्ये डबल इंजिनचं सरकार येणार आहे. केंद्रीय मंत्री आणि ऑल इंडिया मतुआ फेडरेशनचे संघाधिपती शंतनू ठाकूर यांच्या उपस्थितीत त्यांनी सीएएच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारच्या वचनबद्धतेचं आश्वासनही दिलं.

Suvendu Adhikari vs Mamata Banerjee
Narendra Modi : पंतप्रधान मोदींना धमकी देणाऱ्या तरुणाला अटक; रात्री उशिरा ATS नं घेतलं ताब्यात

कलम 370 रद्द केल्यामुळं जम्मू-काश्मीरमध्ये सकारात्मक बदल झाला असून विकासाला सुरुवात झाल्याचं भाजप नेते म्हणाले. त्याचप्रमाणं CAA मुळं मतुआ समाजाला भारतीय नागरिकत्वाचा सन्मान मिळेल. मी लोकशाही पद्धतीनं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना माजी मुख्यमंत्री करीन, असं आव्हानही विरोधी पक्षाच्या नेत्यानं दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.