Indian Citizenship: CAA लागू झाल्यानंतर 18 पाकिस्तानी निर्वासित झाले भारतीय नागरिक, गुजरात सरकारने दिले प्रमाणपत्र

Indian Citizenship: एकीकडे देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू झाल्यानंतर निर्वासितांबाबत चर्चा जोरात सुरू आहे. या काळात पाकिस्तानमधील काही हिंदू निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे.
Indian Citizenship (Representational Image PTI)
Indian Citizenship (Representational Image PTI)esakal
Updated on

Indian Citizenship:

अहमदाबाद: एकीकडे देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू झाल्यानंतर निर्वासितांबाबत चर्चा जोरात सुरू आहे. या काळात पाकिस्तानमधील काही हिंदू निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. प्रकरण गुजरातमधील अहमदाबाद येथील आहे.येथे राहणाऱ्या पाकिस्तानमधील १८ हिंदू निर्वासितांना शनिवारी भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले.

हे सर्वही हिंदू अहमदाबाद येथे राहात होते. शनिवारी(ता. १६) येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने विस्थापितांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष संघवी हे उपस्थित होते.

‘‘आपण सर्व देशाच्या विकासात योगदान द्याल ही आमची अपेक्षा आहे, ज्यांना भारताचे नागरिकत्व मिळाले आहे त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी, राज्य सरकार आणि केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे,’’ असे प्रतिपादनही संघवी यांनी यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)

Indian Citizenship (Representational Image PTI)
Electoral Bonds: निवडणूक रोख्यांसंदर्भातील नवीन माहिती आली समोर; आयोगाने वेबसाईटवर केली अपलोड

आतापर्यंत एकूण एक हजार १६७ हिंदू विस्थापितांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. हे सर्व नागरिक अहमदाबादचे रहिवासी आहेत. २०१६ आणि २०१८च्या एका अधिसूचनेनुसार, अहमदाबाद, गांधीनगर आणि कच्छ येथील जिल्हाधिकाऱ्यांना पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगला देशातील अल्पसंख्याक समुदायाच्या नागरिकांना नागरिकत्व देण्याचा अधिकार देण्यात आला आहे, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

देशात नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच CAA लागू झाला आहे.या कायद्यानुसार भारताच्या शेजारील देश पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील धार्मिक अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व दिले जाऊ शकते. या मुद्द्यावरून देशभरात मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, आता हे प्रकरण शांत झाले आहे.

Indian Citizenship (Representational Image PTI)
Mahadev Betting App Case : लोकसभा निवडणुकीपूर्वी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अडचणीत! महादेव बेटिंग ॲप प्रकरणी FIR दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.