कॅब चालक निघाला Uberचा मालक!
आपल्या ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी उबेरचे मालक प्रयत्न करत आहेत, त्यासाठी ते उबेर कॅबमधून प्रवाशांबरोबर प्रवास करत आहेत. सिंग यांच्याबरोबर प्रवास केलेल्या अनन्या द्विवेदी, मधुवंती सुंदरराजन यांनी त्यांचे वैयक्तिक अनुभव LinkedIn वर शेअऱ केले आहेत.
लिंकडीन युझर अनन्या द्विवेदीने एक पोस्ट शेअर केली आहे. ती म्हणते, घरी एकटं बसलेलो असताना नशीब कसे फिरेल असे सांगता येत नाही. अनन्या द्विवेदी ArtPillz च्या संस्थापक असून ऑफिसमध्ये जाण्यासाठी कॅब बुक केली होती. तेव्हा Uber India च्या बॉसनी त्यांची ओळख करून दिली. तेव्हा क्षणभर कळले नाही. गुगल करून त्यांचा फोटो पाहिला तेव्हा तो मिळता जुळता निघाला. त्यामुळे खात्री पटली. प्रवासादरम्यान त्यांनी उबेरविषयक गप्पा मारल्या. ग्राहकांच्या समस्यांच्या मुळापर्यंत जाण्यासाठी खरी नम्रता आणि धैर्य लागते, असे तिने लिहिले आहे. तिने ही पोस्ट फोटोसह लिहिली आहे. तसेच मधुवंती सुंदरराजन, D2C युनिकॉर्न स्टार्टअप मामाअर्थच्या ब्रँडच्या महाव्यवस्थापक यांनीही सिंग यांच्याबरोबर प्रवास करून आपले अनुभव शेअर केले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.