Patna High Court: पत्नीला 'भूत' किंवा 'पिशाच' म्हणणं क्रूरता नाही; हायकोर्टाने दिला पतीला दिलासा

पतीने आपल्या पत्नीला भूत किंवा पिशाच म्हणण्याला क्रूरता म्हटलं जाऊ शकत नाही असं महत्त्वाचं निरीक्षण पाटना हायकोर्टाने नोंदवलं आहे
High Court
High Court
Updated on

Law News: पतीने आपल्या पत्नीला भूत किंवा पिशाच म्हणण्याला क्रूरता म्हटलं जाऊ शकत नाही असं महत्त्वाचं निरीक्षण पाटना हायकोर्टाने नोंदवलं आहे. पीठाचे न्यायमूर्ती बिवेक चौधरी म्हणाले की, वैवाहिक संबंधात विशेषत: अपयथी ठरलेल्या वैवाहिक संबंधामध्ये पती आणि पत्नी एकमेकांविरोधात अनेकदा घाणेरड्या भाषेचा वापर करतात. पण, असे सर्वच आरोप क्रूरतेच्या व्याख्येत येत नाहीत.

कलम ४९८A आणि हुंडा प्रतिबंधक कायदा १९६१ नुसार पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाटना हायकोर्टाने पतीवरील गुन्हे रद्द केले आहेत. नालंदा अतिरिक्त सत्र न्यायालयाने पतीला दोषी ठरवत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. याविरोधात पतीने पाटना हायकोर्टात धाव घेतली होती. (Calling Wife Bhoot Pishach Not Cruelty Patna High Court Sets Aside Husband Conviction)

High Court
Law News: 2 पेक्षा जास्त मुलं असलेल्यांना सरकारी नोकरी नकोच; सुप्रीम कोर्ट नेमकं काय म्हणाले?

महिलेच्या वडिलांनी १९९४ मध्ये मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. मुलीचा पती आणि तिच्या सासरच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली होती. पती मुलीचा मानसिक आणि शारीरिक छळ करतो असं तक्रारीमध्ये म्हणण्यात आलं होतं. हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार, पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासानंतर पोलिसांनी पती आणि इतर अकरा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर सत्र आणि अपिलिय कोर्टाने आरोपी पतीला एक ते दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर पतीने हायकोर्टाने धाव घेतली. पतीच्या बाजूने वकिलाने कोर्टात म्हटलं होतं की, हुंडा कोणी मागितला, कधी मागितला आणि पत्नीला कशा पद्धतीने त्रास देण्यात आला याचा कोणताही स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही.

High Court
Pre Marital Disease Divorce: पत्नीचा डावा डोळा गाढ झोपेतही उघडा, घटस्फोटासाठी पतीची न्यायालयात धाव, कोर्ट म्हणालं....

महिलेच्या वडिलांनी कोर्टात दावा केला होता की, सासरचे मुलीला भूत आणि पिशाच म्हणतात. तसेच मुलीने सासरच्यांकडून अत्याचार होत असल्याचं पत्राद्वारे वारंवार कळवलं होतं असा दावा वडिलांनी केला होता. हायकोर्टाने यावर म्हटलं की, भूत किंवा पिशाच ही क्रूरता नाही. शिवाय, मुलीने वडिलांना लिहिलेले एकही पत्र कोर्टासमोर सादर करण्यात आलेलं नाही. हायकोर्टाने फेरविचार याचिका दाखल करण्याची परवानगी दिली आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.