Khalistan: परदेशातील खलिस्तानी समर्थकांना मोठा दणका; ओव्हरसीज सिटिझनशीप रद्द करण्याचा भारताचा निर्णय

Khalistan sympathisers
Khalistan sympathisers
Updated on

नवी दिल्ली- भारत आणि कॅनडामध्ये सुरु झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भारत कठोर पाऊलं उचलत असल्याचं दिसत आहे. परदेशात राहणाऱ्या खलिस्तान समर्थकांना धडा शिकवण्यासाठी भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. परदेशात राहणाऱ्या खलिस्तानी नेत्यांचे आणि त्यांच्या समर्थकांचे ओव्हरसीज सिटिझनशीप म्हणजे ओसीआय कार्ड रद्द करण्याच्या सूचना केंद्र सरकारने तपास यंत्रणांना दिल्या आहेत.

भारताच्या या निर्णयामुळे दहशतवाद्यांची आर्थिक रसद बंद करण्यास मदत होणार आहे. तसेच दहशतवाद्यांच्या भारतातील प्रवासावर बंदी येईल, असं सांगण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे अमेरिका, यूके, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये राहणाऱ्या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना मोठा दणका बसणार आहे. Times Now ने यासंदर्भातील वृत्त दिलंय.

Khalistan sympathisers
India-Canada: भारत की कॅनडा, वेळ पडल्यास कोणाला निवडणार? अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं

खलिस्तान समर्थक भारतात येऊ नयेत यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. शनिवारी भारतीय तपास यंत्रणेने कॅनडातील दहशतवादी आणि खलिस्तान समर्थक गुरपतवंत सिंग पन्नू याची पंजाबमधील मालमत्ता जप्त केली होती. त्याचे पंजाबमधील घर आणि पाच एकर जमीन एएनआयने ताब्यात घेतली होती. त्यानंतर सरकारचा हा निर्णय आला आहे.

परदेशी भूमीत राहून भारत विरोधी कारवाई करण्यासाठी सिख्स फॉर जस्टिस ही संघटना कार्यरत आहे. पन्नू हा संघटनेचा मुख्य हँडलर असल्याची माहिती एएनआयने दिली आहे. पन्नू सोशल मीडियाच्या माध्यमातून पंजाबमधील तरुणांना भूलवतो आणि त्यांना संघटनेत सहभागी करु घेतो. यासाठी तो निधी देखील जमा करत असल्याची माहिती आहे.

यादी जाहीर

भारताने अमेरिका, कॅनडा, यूके, यूएस, पाकिस्तान, यूएई आणि इतर देशात राहणाऱ्या १९ खलिस्तानी दहशतावाद्यांची यादी जाहीर केली आहे. यूके स्थित परमजीत सिंग पम्मा, पाकिस्तानातील वाधवा सिंग बब्बर उर्फ ​​चाचा, कुलवंत सिंग मुथडा (यूके), जेएस धालीवाल (यूएस), सुखपाक सिंग (यूके), हॅरिएट सिंग उर्फ ​​राणा संग (यूएस), सरबजीत सिंग बेनूर (यूके), कुलवंत सिंग उर्फ ​​कांता (यूके), हरजप सिंग उर्फ ​​जप्पी डिंग (यूएस) यांचा यादीत समावेश आहे.

Khalistan sympathisers
NIA कडून खलिस्तानी दहशतवाद्याला झटका! भारतीयांना कॅनडा सोडायला लावणाऱ्या पन्नूची संपत्ती जप्त, 'या' ठिकाणी होती मालमत्ता

रणजित सिंग नीता (पाकिस्तान), गुरमीत सिंग उर्फ ​​बग्गा, गुरप्रीत सिंग उर्फ ​​बागी ​​(यूके), जस्मिन सिंग हकीमजादा (यूएई), गुरजंत सिंग धिल्लन (ऑस्ट्रेलिया), जसबीत सिंग रोडे (युरोप आणि कॅनडा), अमरदीप सिंग पुरेवाल (यूएस), जतिंदर सिंग ग्रेवाल (कॅनडा), दुपिंदर जीत (यूके) आणि एस हिम्मत सिंग (यूएस) यांची नावे यादीमध्ये आहेत. यांची भारतातील संपत्ती देखील जप्त केली जाणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.