नवी दिल्लीः दिल्ली महिला आयोगामध्ये काम करणाऱ्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांची कंत्राटे सोमवारी रद्द करण्यात आली. या कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती बेकायदा पद्धतीने करण्यात आली होती, या भरती प्रक्रियेवेळी नियमांची पायमल्ली करण्यात आली होती त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे, असे अधिकृत सूत्रांचे म्हणणे आहे. या कर्मचाऱ्यांची कंत्राटे रद्द करण्याबाबत एप्रिलमध्ये आदेश निघाले होते मात्र कर्मचाऱ्यांना त्यांचे कंत्राट रद्द करण्यात आल्याचे सोमवारी सांगण्यात आले.