Medicine Price : कॅन्सरसह 'या' आजारांवरची औषधं 40 टक्क्यांनी स्वस्त; जाणून घ्या नव्या किमती
जगभरात दरवर्षी कर्करोगाचं (Cancer) प्रमाण वाढत आहे. असंसर्गजन्य रोगांपैकी कर्करोग हे मृत्यूचं प्रमुख कारण आहे. जगातील प्रत्येक सहावा मृत्यू यामुळं होतो.
जगभरात दरवर्षी कर्करोगाचं (Cancer) प्रमाण वाढत आहे. असंसर्गजन्य रोगांपैकी कर्करोग हे मृत्यूचं प्रमुख कारण आहे. जगातील प्रत्येक सहावा मृत्यू यामुळं होतो. त्याच पार्श्वभूमीवर लोकांना दिलासा देण्यासाठी सरकारनं कॅन्सरसह अनेक आजारांवर उपचारात वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किमती 40 टक्क्यांपर्यंत कमी केल्या आहेत.
याअंतर्गत अत्यावश्यक औषधांच्या यादीत येणाऱ्या 119 औषधांची (Medicine) कमाल किंमत निश्चित करण्यात आलीये. त्यामुळं कर्करोग, ताप, मधुमेह यासह अनेक आजारांचा खर्च 40 टक्क्यांनी कमी झाला आहे.
एनपीपीएनं (NPPA) औषधांच्या किमती कमी केल्या आहेत. यात रक्तातील यूरिक अॅसिड कमी करण्यासाठी वापरलं जाणारं औषध, मलेरियासाठी औषध, तापावरील औषध, पॅरासिटामॉल याचाही समावेश आहे. या औषधांच्या किमती 40 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आल्या आहेत.
औषधाचे नाव - नवीन दर
Allopurinol - 5.02
Temozolomide - 393
Sofosbuvir - 468
Clarithromycin - 34
Letrozole -26.15
Heparin - 18
Fluconazole - 26.5
Cefixime - 19.7
Metformin - 3.11
Paracetamol - 1.78
Hydroxychloroquine - 12.31
कर्करोगाच्या रुग्णांत वाढ
जगभरात दरवर्षी कर्करोगाचं प्रमाण वाढत आहे. भारतातही दरवर्षी कॅन्सरचे 13 लाख नवे रुग्ण निर्माण होत आहेत. आता तर लहान वयातही लोक या आजाराला बळी पडत आहेत, ही चिंतेची बाब आहे. वयाच्या पन्नाशीपूर्वीच स्तनाचा कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग आणि तोंडाच्या कर्करोगाची प्रकरणं समोर येत आहेत. स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या कर्करोगाची सर्वाधिक प्रकरणं महिलांमध्ये दिसून येत आहेत. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या जीवनशैलीमुळं या आजाराची प्रकरणं झपाट्यानं वाढत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. 25 ते 40 वयोगटातील अनेक प्रकरणं समोर येत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.