दिल्ली : पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांनी मंगळवारी संध्याकाळी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देताना सोनिया गांधी यांना लिहीलेल्या पत्रात प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Sidhu) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी सिध्दू हे पाकिस्तानचे हितचिंतक आणि अस्थिर मनाचा माणूस असल्याचे म्हटले आहे. दरम्यान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या सात पानी राजीनामा पत्रात सिंह यांनी लिहिले की, मी त्यांच्या वडिलांच्या वयाचा आहे, तरीही त्यांनी माझ्याबद्दल अपमानास्पद आणि अपशब्द वापरणे सुरूच ठेवले आहे.
मंगळवारी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पक्षाचा राजीनामा देत काँग्रेसला मोठा धक्का देत नवीन पक्षाची घोषणा केली. त्यांनी आपल्या पक्षाचे नाव पंजाब लोक काँग्रेस असे ठेवले आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या सात पानी पत्रात त्यांनी “माझ्याविरुद्ध अत्यंत घाणेरडी आणि घृणास्पद भाषा वापरली गेली,” असे म्हटले आहे.
त्यांनी लिहीले की, “तो (नवज्योतसिंग सिद्धू) मला आणि माझ्या सरकारला सतत शिवीगाळ करत असे. मी त्यांच्या वडिलांइतकाच म्हातारा आहे, पण तरीही त्यांनी सार्वजनिक किंवा खाजगीत माझ्याविरुद्ध घाणेरडी आणि अपमानास्पद भाषा वापरणे सुरुच ठेवले"
नवज्योतसिंग सिद्धू यांना टाळण्याचा सल्ला आपण सोनिया गांधींना वारंवार दिला होता, पण त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचेही सिंह यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे तसेच त्यांनी सोनिया गांधी यांच्यावरही निशाणा साधला. 52 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीनंतरही काँग्रेसने त्यांचा आदर केला नाही, असेही ते म्हणाले. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी लिहीले की, त्यांनी आयुष्यभर काँग्रेसची सेवा केली, पण पक्षाने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही.
सिध्दू हे पाकिस्तानचे हितचिंतक
कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आपल्या राजीनाम्यात लिहिले आहे की, 'माझ्या मोठ्या विरोधानंतरही नवज्योतसिंग सिद्धू पाकिस्तानात गेले आणि त्यांनी लष्करप्रमुख बाजवा आणि पंतप्रधान इम्रान खान यांची गळाभेट घेतली. तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.'
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांच्या पत्रात राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचा देखील उल्लेख केला आहे. त्याने लिहिले की, राहुल आणि प्रियंकाने मला निराश केले. तरी माझे त्यांच्यावर पूर्वीसारखेच प्रेम अजूनही आहे. त्यापुढे त्यांनी लिहीले की, मी माझ्या मुलांवर जितकं प्रेम करतो तितकचं प्रेम राहुल आणि प्रियंका यांच्यावर कतो. दरम्यान पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असून त्यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी 'पंजाब लोक काँग्रेस' या नावाने आपला नवा पक्ष स्थापन केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.