चंदीगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amarinder Singh) यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. मुख्यमंत्री असताना नवज्योत सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्याची शिफारस पाकिस्तानातून (Pakistan) आल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, इम्रान खानच्या (Imran Khan) जवळच्या मित्रांनी सिद्धूला मंत्री बनवण्यासाठी लॉबिंग केले होते. दरम्यान, याबाबतच आपण सोनिया गांधी आणि प्रियंका (Sonia Gandhi & Priyanka Gandhi) यांना माहिती दिली होती, असे देखील सिंग यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. कॅप्टनच्या या वक्तव्यामुळे पंजाबमधील राजकीय (Punjab Assembly Election 2022) चर्चांना उधाण आलं असून, अमरिंदर सिंग यांच्या या वक्तव्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू देखील कॅप्टनबाबत मोठा खुलासा करणार असल्याचे म्हणाले आहेत.
अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांनी रविवारी पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या नव्याने स्थापन झालेल्या पक्ष- 'पंजाब लोक काँग्रेस' (PLC) च्या 22 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, पाच वर्षांपूर्वी जेव्हा सिद्धू काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याची चर्चा होती, तेव्हा त्यांनी सोनिया गांधींना (Sonia Gandhi) यापासून रोखले होते. ‘सिद्धूमध्ये मेंदू नावाची गोष्ट नाही, असे मी पहिल्याच दिवशी बोललो होतो.' सिद्धूंविरुद्ध निवडणूक लढवणार का? या प्रश्नाला उत्तर देताना कॅप्टन म्हणाले की, 'मी म्हणालो होतो की आम्ही सिद्धू यांना जिंकू देणार नाही, कारण ते पूर्णपणे अक्षम व्यक्ती आहेत.'
तिकीट देण्यात आलेल्यांमध्ये या व्यक्तींचा समावेश
अमरिंदर सिंग यांनी त्यांच्या पक्षाच्या (Punjab Assembly Elections) तिकिटावर ज्या 22 जणांना उमेदवारी दिली आहे, त्यात त्यांच्यासह 9 जाट शीख, 4 एससी, 3 ओबीसी, 5 हिंदू आणि 1 मुस्लिम महिला आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीत पीएलसी 37 जागांवर उमेदवार उभे करणार आहे. यामध्ये मालवातील 26, माझातील 7 आणि दोआबातील 4 जागांचा समावेश आहे. मालवातील सर्वाधिक 26 जागा अशा आहेत ज्या पूर्वी अमरिंदरच्या पटियाला संस्थानाचा भाग होत्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.