तामिळनाडूमध्ये देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत (bipin rawat) यांचे हेलिकॉप्टर क्रॅश (helicopter crash) झाले. या अपघातात सीडीएस रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाला. काही लोक या घटनेवर शोक व्यक्त करत आहेत, तर अनेक जण आपली मते मांडत आहेत. आर्मी हेलिकॉप्टरमध्ये जखमी झालेले आणि सध्या जीवन मरणाशी संघर्ष करणारे ग्रुप कॅप्टन वरुणसिंग (captain varun singh) यांचं एक पत्र सध्या व्हायरल होतंय. संरक्षण मंत्र्यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, वरुणसिंग हे सध्या बंगळुरुच्या हॉस्पिटलमध्ये असून लाईफ सपोर्ट सिस्टीमवर आहेत. काय म्हटलंय त्यात..?
शाळेतल्या मुख्याध्यापकांना प्रेरणादायी पत्र
हे पत्र तामिळनाडूतील त्यांच्या शाळेतल्या मुख्याध्यापकांना लिहिल्याचं म्हटलं जातंय. वरुणसिंग हे अनेक वीरता पुरस्कारानं सन्मानित आहेत. शौर्य चक्रनं सन्मानीत असलेले वरुणसिंग सध्या मात्र मृत्यूशी झुंज देत आहेत. वरुणसिंग यांना जेव्हा शौर्य चक्र मिळालं, त्यावेळेस त्याचं श्रेय त्यांनी मिल्ट्री स्कूल, एनडीए आणि त्यानंतर एअरफोर्समधल्या त्यांच्या सहकाऱ्यांना दिलं. हे पत्र खरं की खोटं? याबाबत जरी शंका उपस्थित करण्यात आली असेल, तरी त्या पत्रात जे काही लिहिलंय ते नक्कीच प्रेरणादायी आहे.
जीवन मरणाशी संघर्ष करणारे कॅप्टन वरुणसिंग यांचं पत्र व्हायरल
"प्रत्येक जण काही शाळेत उत्कृष्ट असतोच असं नाही. साधारण असणंही ठिक आहे. प्रत्येकाला काही 90 टक्क्याचा स्कोअर करता नाही येणार. पण जे करत आहेत त्यांची स्तुती केलीच पाहिजे. पण ज्यांना हे जमत नाही, त्यांनी असा विचार करु नये की ते साधारण बुद्धीमत्तेचे आहेत. म्हणजे जीवनात येणाऱ्या गोष्टींना ठरवणारी ही काही एकमेव बाब नाही. तुम्हाला कशात रस आहे ते शोधा. संगीत, ग्राफिक डिझाईन, साहित्य कशातही तुमची रुची असू शकते. तुम्ही जेही काम करताय, त्याला पूर्णपणे समर्पित असा. सर्वश्रेष्ठ प्रदर्शन कसं करता येईल ते बघा. हा विचार करुन कधी बेडवर झोपायला जाऊ नका की मी अजून प्रयत्न करु शकलो असतो." एक युवा कॅडेट म्हणून माझ्यात आत्मविश्वास कमी होता. एका लढवय्या स्क्वाड्रनमध्ये युवा फ्लाईट लेफ्टनंट झाल्यानंतर मला जाणीव झाली की, मी थोडं डोकं लावलं, मनापासून रस घेतला तर मी आणखी चांगलं करु शकतो. त्यानंतर मी सर्वश्रेष्ठ बनण्यासाठी काम सुरु केलं. मला फक्त ‘पास’ होण्याच्या अटी पूर्ण करायच्या नव्हत्या"
माझे शिक्षक, प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेल्या सल्ल्याचा परिणाम
"राष्ट्रीय सुरक्षा अकादमी म्हणजेच एनडीएत त्यांनी एक कॅडेट म्हणून ना खेळात ना अभ्यासात उत्कृष्ट प्रदर्शन केलं. पण मी जेव्हा आयएएफमध्ये दाखल झालो तेव्हा मला जाणीव झाली की मला विमानात खास रुची आहे, ते माझं पॅशन आहे, आणि त्यानंच मला माझ्या सहकाऱ्यांवर ‘बढत’ मिळवून दिलीय. एवढं असूनही मला माझ्या वास्तविक क्षमतांवर भरोसा नव्हता. माझा असा विश्वास आहे की, मी जे काही काम केलंय, कामगिरी बजावलीय, ती माझे शिक्षक, प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेल्या सल्ल्याचा परिणाम आहे."
18 सप्टेंबर 2021 ला लिहिलेलं एक पत्र
वरुणसिंग यांनी तामिळनाडूतील चंडी मंदिरच्या आर्मी पब्लिक स्कूलमधून शिक्षण घेतलेलं आहे. त्याच शाळेच्या प्रिन्सिपलला 18 सप्टेंबर 2021 ला त्यांनी एक पत्र लिहिलेलं आहे. हे पत्र म्हणजे वरुणसिंग शाळेत असताना कसे होते आणि नंतर त्यांचे विचार, आचरण कसं बदलत गेलं याबाबत सांगण्यात आलेले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.