Fact Checker Zubair: यूपीतील शालेय मुलाला मारहाण प्रकरणी फॅक्ट चेकर झुबेरवर गुन्हा दाखल

झुबेरनं नेमकं काय केलंय की त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mohammed Zubair Latest News
Mohammed Zubair Latest NewsMohammed Zubair Latest News
Updated on

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील एका मुस्लिम विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षिकेनं वर्गातील इतर विद्यार्थ्यांना शिक्षा देण्यास सांगितल्याचा व्हिडिओ समोर आला होता. या प्रकरणाची देशभरातून निंदा झाल्यानंतर आता ऑल्ट न्यूज या फॅक्ट चेक वेबसाईटचे सहसंस्थापक मोहम्मद झुबेर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Case against fact checker Mohammed Zubair over video of UP schoolboy being hit)

Mohammed Zubair Latest News
RIL AGM Meeting: "AI आता सर्वांकडं आणि सगळीकडं"; अंबानींची मोठी घोषणा

झुबेर यांच्यावर ज्युवेनाईल जस्टीस कायद्यातील कलम ७४ नुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झुबेर यांच्याकडून या घटनेचं फॅक्टचेक प्रसिद्ध करताना शालेय विद्यार्थ्याला मारहाणीचा व्हिडिओ प्रसारित करताना संबंधित अल्पवयीन मुलाचा चेहरा आणि ओळख लपवली गेली नाही, असा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Mohammed Zubair Latest News
Ajit Pawar on Bhujbal: "भुजबळ काय म्हणाले, ऐकूच आलं नाही"; शरद पवारांवरील टीकेवर अजितदादांचं स्पष्टीकरण

काय होती घटना?

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर इथल्या एका शाळेत तृप्ता त्यागी नामक शिक्षिकेनं तिच्या वर्गातील एका मुस्लीम विद्यार्थ्याला वर्गातील इतर विद्यार्थ्यांना चांगला चोप देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, इतर विद्यार्थ्यांनी एकामागून एक त्याच्या कानशिलात लगावली होती. (Marathi Tajya Batmya)

एखाद्या लहान विद्यार्थ्याला अशा पद्धतीनं शिक्षा करणं हे अमानुष आहे, त्यात तो मुस्लीम धर्मीय असल्यानं शिक्षिकेनं ही कृती जाणीवपूर्वक केल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यामुळं संबंधित शिक्षेकेवर आयपीसी कलम ३२३ (एखाद्याला दुखापत करणं) आणि ५०४ अंतर्गत (जाणीवपूर्व अपमान करणं आणि शांतता भंग करण्यासाठी प्रोत्साहन देणं) हे दोन्ही अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांमध्ये आरोपीला तात्काळ अटक होत नाही.

शिक्षेकनं दिलं होतं स्पष्टीकरण

दरम्यान, विद्यार्थ्याला मारहाणीचा आरोप झालेल्या शिक्षिकेनं आपली बाजू मांडताना काही आरोपही केले होते. जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे वातावरण बिघडवण्यासाठी त्यात छेडछाड करण्यात आली आहे. हा व्हिडिओ संबंधित विद्यार्थ्याच्या पालकांनी शूट केल्याचा आरोपही शिक्षिकेनं केला. ज्या विद्यार्थ्याच्या कानशिलात देण्यास सांगितलं त्यांन गृहपाठ केला नव्हता, त्यामुळं त्याला शिक्षा करताना मला खुर्चीतून उठून उभा राहणं शक्य नव्हतं कारण मी अपंग आहे, असा दावाही या शिक्षिकेनं केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.