नवी दिल्ली: मागील काही दिवसांपासून अलिगड विद्यापीठातील विद्यार्थी नेता शरजील उस्मानी चर्चेत आहे. आता त्याच्यावर दिल्लीत IPC च्या 505 कलमांर्गत गुन्हा दाखल झाला आहे. आक्षेपार्ह ट्विट केल्याची तक्रार भाजप नेत्याने केली होती. त्यानंतर उस्मानीवर गुन्हा दाखल झाला आहे.
अलिगड मुस्लीम विद्यापीठातील (Aligarh Muslim University) विद्यार्थी नेता आणि पुण्यातील दुसऱ्या एल्गार परिषदेतील (Elgar Parishad) कथीत वादग्रस्त विधानप्रकरणी चर्चेत आलेला शरजील उस्मानी (Sharjeel Usmani) आता पुन्हा दिल्लीत गुन्हा दाखल झाल्याने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
शरजील उस्मानीवर आक्षेपार्ह ट्विटप्रकरणी जालन्यातही दोन दिवसांपुर्वी (Jalna) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (FIR filed on Aligarh Mushlim University Student leader Shrjeel Usmani in Jalana for objectinable Tweets)
यावर्षाच्या सुरुवातीला पुणे पोलिसांनी शरजील उस्मानीविरोधात चिथावणीखोर विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. ३० जानेवारी रोजी पुण्यात पार पडलेल्या दुसऱ्या एल्गार परिषदेत त्यांनी हे विधान केलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.