नवी दिल्ली- संघ विचारांशी जवळीक असणाऱ्या नियतकालिकाच्या अग्रलेखामध्ये जात व्यवस्थेचे समर्थन करण्यात आले आहे. पांचजन्यचे संपादक हितेश शंकर यांनी अग्रलेखामध्ये जात हा भारताला जोडणारा घटक असल्याचं म्हटलं आहे. सध्या राज्यात जातीवरून सुरू असलेलं राजकारण आणि नुकतेच भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी संसदेत राहुल गांधींच्या जातीबाबत वक्तव्य केलं होतं. या पार्श्वभूमीवर पांचजन्यमधील अग्रलेखाकडे पाहिलं जात आहे.
अग्रलेखामध्ये काँग्रेसवर देखील टीका करण्यात आली आहे. सांप्रदायिक बंधुभाव असलेले हिंदू जीवन जातीभोवती फिरत असतं. मिशनरींना ही गोष्ट समजू शकली नाही. कारण, त्यांचे व्यक्तीवादावर जास्त लक्ष आहे. जात त्यांना धर्मातील अडथळा वाट होती. तसेच काँग्रेस देखील ब्रिटिशांचा हेतू पुढे चालवत आहे, असं अग्रलेखात म्हणण्यात आलंय.