काही महिन्यांपूर्वी बिहारमध्ये देशातील पहिली जातनिहाय जनगणना झाली होती. नंतर त्याच्या आधारावर आरक्षणाची मर्यादाही वाढवण्यात आली होती. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या सरकारने जातनिहाय जनगणना केली होती. ते सध्या भाजपसोबत युतीमध्ये आहेत. केंद्र सरकारही त्यांच्या पाठिंब्यावर चालत आहे आणि राज्यातही भाजप आणि जेडीयू एकत्र आहेत.
दरम्यान जेडीयू अनेकवेळा जात जनगणनेची मागणी करत असते. याशिवाय चिराग पासवान यांनीही नुकतीच जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती. काँग्रेस, सपा, राजदसह देशातील सर्व मोठे राजकीय पक्ष ही मागणी सातत्याने करत आहेत.