Caste Survey: काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर जातीनिहाय सर्वेक्षण केले जाईल ; राहुल गांधींचे आश्वासन!

Caste Survey: Congress Party in Favour of Nationwide Survey; Rahul Gandhi's Assurance!
Rahul Gandhi
Rahul Gandhi Esakal
Updated on

Caste Survey : "तेलंगणमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर जातिनिहाय सर्वेक्षण केले जाईल. यामुळे केसीआर यांच्या कुटुंबाने तेलंगणला नेमके किती लुटले? याचा तपशील समजू शकेल," असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज केले. राहुल यांच्या 'विजयभेरी यात्रेला आज येथून प्रारंभ झाला. या निमित्त आयोजित सभेत ते बोलत होते.

राहुल म्हणाले, "पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री केसीआर हे जेव्हा भाषण द्यायला सुरूवात करतील तेव्हा त्यांना तेलंगण राज्यामध्ये आपण जातिनिहाय सर्वेक्षण कधी करणार? असा प्रश्न विचारायला हवा. " विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल हे तीन दिवसांच्या तेलंगण दौऱ्यावर आले असून आज त्यांनी थेट लोकांशी संवाद साधला.

Rahul Gandhi
NCP Political Crisis: 'अजित पवारांसोबत गेलेल्या काही लोकांना पुन्हा यायचंय पण..', शरद पवार गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट

"सध्या जातिनिहाय सर्वेक्षण हाच केवळ भारतातील संवेदनशील विषय आहे. अशाप्रकारच्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून समाजातील अनुसूचित जाती-जमाती व मागास घटकांच्या प्रमाणावर एक्स रे टाकला जाईल. केंद्रात सत्तेत आल्यानंतर आम्ही देशभर अशा प्रकारचे सर्वेक्षण करण्याचे आश्वासन दिले असून काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत याबाबत ठराव मंजूर करण्यात आला आहे. आमच्याकडे सत्ता आल्यानंतर कायदा करून आरक्षणावरील पन्नास टक्क्यांची मर्यादाही हटविण्यात येईल," असे राहुल म्हणाले.

पाच टक्केच ओबीसी आहेत का ?

"केंद्रातील भाजपच्या सरकारने उद्योजक गौतम अदानी यांचे कर्ज माफ केले असून गरीब शेतकरी व कामगारांचे कर्जमात्र माफ केले जात नाही. देशाचे पाच टक्के बजेट हे केवळ ओबीसींकडून निश्चित केले जात असेल तर देशामध्ये केवळ पाच टक्केच ओबीसी आहेत का? असा सवाल मी मोदी व केसीआर यांना विचारतो आहे. राज्यातील केसीआर यांचे सरकार सर्वाधिक भ्रष्ट सरकार असून केवळ एकाच कुटुंबाकडून ते चालविले जाते." असेही ते म्हणाले.

Rahul Gandhi
Maha Jyoti Ph D Subsidy : महाज्योती संस्थेतर्फे 1884 पीएच. डी. करणाऱ्यांना 24 कोटी; या संकेतस्थळावर करा अर्ज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.