CBI : ''मुलं जन्माला घाला अन् पाच लाख घेऊन जा'' राजरोस सुरु होता गोरखधंदा...

सीबीआयने दिल्ली एनसीआरमधून सात ते आठ नवजात बालकांना वाचवलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या केसची पाळंमुळं दिल्लीच्या सीमेच्याही पलिकडे पसरलेली आहेत. अटक करण्यात आलेल्या लोकांमध्ये एक तर हॉस्पिटलचा वॉर्डबॉय आहे...
CBI : ''मुलं जन्माला घाला अन् पाच लाख घेऊन जा'' राजरोस सुरु होता गोरखधंदा...
Updated on

Child Trafficking Racket : दिल्लीमध्ये राजरोसपणे सुरु असलेला मुलांच्या तस्करीचा गोरखधंदा सीबीआयने उघड केला आहे. सीबीआयने या प्रकरणी दिल्ली, हरियाणा येथील आठ ठिकाणांवर छापेमारी केली आहे. दिल्लीतल्या केशवपूरम भागात एका घरातून तीन नवजात बालकांना वाचवण्यात आलेलं आहे.

सीबीआयच्या सूत्रांनी सांगितलं की, नवजात बालकांना काळ्या बाजारात वस्तूंप्रमाणे विकलं आणि खरेदी केलं जात होतं. या प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींची सीबीआयकडून चौकशी सुरु आहे. यामध्ये मुलांना विकणाऱ्या महिलेसह खरेदी करणारे दोघे सहभागी आहेत.

सीबीआयने दिल्ली एनसीआरमधून सात ते आठ नवजात बालकांना वाचवलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या केसची पाळंमुळं दिल्लीच्या सीमेच्याही पलिकडे पसरलेली आहेत. अटक करण्यात आलेल्या लोकांमध्ये एक तर हॉस्पिटलचा वॉर्डबॉय आहे आणि अनेक इतर महिलांचा समावेश आहे.

सीबीआयच्या सूत्रांनी सांगितलं की, या प्रकरणाचा तपास आता अनेक राज्यांपर्यंत जावून पोहोचला आहे. देशातील अनेक प्रमुख रुग्णालयं या चौकशीच्या फेरीमध्ये अडकत आहेत. नवजात शिशूंना चार ते पाच लाख रुपयांना विकलं जात असल्याचं पुढे येत आहे. 'आज तक'ने हे वृत्त दिलं आहे.

चाईल्ड तस्करीबद्दल काही दिवसांपूर्वी सीबीआयला काही इनपुट्स मिळाले होते. ज्याच्या आधारावर एफआयआर दाखल करण्यात आलेला होता. त्यानंतर काही लोकेशनवर छापेमारी सुरु झाली आहे. आरोपींकडून काही हॉस्पिटल्सच्या नावांचा गौप्यस्फोट होत आहे. त्यामुळे याच्याशी संबंधित लोक आणि रुग्णालयं सीबीआयच्या रडावर आलेली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.