भाजपच्या ऑपरेशन लोटससाठी CBI-ED एकत्र काम करताहेत - सिसोदिया

मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयनं छापा टाकला होता. तसेच ईडीनं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Manish Sisodia Latest News
Manish Sisodia Latest NewsManish Sisodia Latest News
Updated on

नवी दिल्ली : भाजपच्या ऑपरेश लोटससाठी CBI-ED एकत्र काम करत आहेत, असा गंभीर आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला आहे. भाजपच्या विरोधी पक्षांना टार्गेट करुन त्यांची सरकारं पाडण्याचं काम सुरु असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. (CBI ED working to execute BJP Operation Lotus says Manish Sisodia)

Manish Sisodia Latest News
PM CARES Fund : रतन टाटा पीएम केअर्स फंडाचे नवे ट्रस्टी

यासंदर्भात सिसोदिया यांनी ट्विट करताना इंडियन एक्सप्रेसच्या बातम्यांचा दाखला दिला आहे, ज्यामध्ये राजकारण्यांविरोधातील ईडीच्या कारवाया विशेषतः जे भाजपविरोधी पक्ष आहे त्यांच्यावर या कारवाया केल्या जात आहेत. भाजप सन २०१४ मध्ये सत्तेत आल्यापासून हे घडत आहे. यावर सिसिदियांनी म्हटलं की, "सध्याच्या काळात सीबीआय आणि ईडी या एकत्रितपणे आपरेशन लोटसची अंमलबजावणी करत आहेत. त्यांच्याकडील ९५ टक्के केसेसद्वारे ते निवडून आलेली सरकारं पाडण्यासाठी हत्यार म्हणून वापर करत आहेत. असंच जर सुरु राहिलं तर देशाची प्रगती कशी होईल"

Manish Sisodia Latest News
अठरा वर्षांपासून रखडलेल्या धारावीच्या पुनर्विकासाबाबत मंत्रिमंडळाचा महत्वाचा निर्णय!

सिसोदिया हे अनेकांपैकी एक आरोपी आहेत ज्यांच्यावर सीबीआयनं दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्यात एफआयआर दाखल झाला आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल विनय सक्सेना यांच्या शिफारशीनुसार सिसोदिया यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे.

Manish Sisodia Latest News
Sharad Pawar : शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ते राहुल गांधीची 'भारत जोडो यात्रा'; पवार म्हणाले...

दिल्लीच्या मद्य धोरणाविरोधात सीबीआयनं देशातील ३० विविध ठिकाणांसह सिसोदिया यांच्या घरावरही छापेमारी केली होती. याप्रकरणी ईडीनंही आर्थिक घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या छापेमारीत बंगळुरु, हैदराबाद, आंध्र प्रदेश, चेन्नई आणि दिल्ली-एनसीआरचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.