Child Trafficking Racket : हॉस्पिटलमधून चोरी की गरजूंच्या असहायतेचा फायदा? दिल्लीतील बाल तस्करी प्रकरणात नवे खुलासे, सस्पेंस आणखी वाढला

Child Trafficking Racket : गरीब लोकांच्या किंवा ज्यांना पैशाची गरज आहे त्यांच्या संमतीने ते मुले विकत घेत असत. यानंतर त्यांनी सोशल मीडियावर जाहिराती देऊन देशभरातील अपत्यहीन जोडप्यांशी संपर्क साधला. त्यानंतर मुलांना चार ते सहा लाख रुपयांना विकले.
Child Trafficking Racket
Child Trafficking RacketEsakal
Updated on

Child Trafficking Racket : दिल्लीमध्ये राजरोसपणे सुरु असलेला मुलांच्या तस्करीचा प्रकार सीबीआयने उघड केला आहे. सीबीआयने या प्रकरणी दिल्ली, हरियाणा येथील आठ ठिकाणांवर छापेमारी केली आहे. दिल्लीतल्या केशवपूरम भागात एका घरातून तीन नवजात बालकांना वाचवण्यात आलेलं आहे.

दरम्यान, केशव पुरम भागात छापा टाकल्यानंतर सीबीआयने मानवी तस्करी टोळीतील सर्व ७ आरोपींना न्यायालयात हजर केले. यासोबतच आरोपींचा ४ दिवसांची कोठडीही सुनावण्यात आली आहे. नीरज आणि इंदू हे या रॅकेटचे सूत्रधार आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये रुग्णालयाच्या वॉर्ड बॉयसह काही महिला आणि पुरुषांचा यामध्ये समावेश आहे.

Child Trafficking Racket
Smriti Irani : लोकशाही रक्षणाचे कॉंग्रेसचे दावे पोकळ; स्मृती इराणी यांचा हल्लाबोल

आतापर्यंतच्या तपासानुसार त्यांनी हॉस्पिटलमधून मुले चोरली नाहीत. तर गरीब लोकांच्या किंवा ज्यांना पैशाची गरज आहे त्यांच्या संमतीने ते मुले विकत घेत असत. अनेकवेळा ते गरिबांकडून अगोदरच मुले घेऊन मग त्यांना विकायचे. सीबीआय वाचवलेल्या मुलांचा तपशील सध्या तपासण्यात येत आहे.

यापूर्वी रुग्णालयातून बालके चोरीची माहिती मिळाली होती

आता ही मुले कोठून खरेदी करण्यात आली याचा सीबीआय तपास करत आहे. याआधी ते हॉस्पिटलमधून मुले चोरत असल्याची माहिती समोर आली होती. या संदर्भात आरोपींची चौकशी करण्यात येत आहे. या तपासात आणखी काही खुलासे होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी सीबीआय इतर राज्यातही छापे टाकू शकते.

Child Trafficking Racket
CBI : ''मुलं जन्माला घाला अन् पाच लाख घेऊन जा'' राजरोस सुरु होता गोरखधंदा...

सुटका करण्यात आलेल्या मुलांमध्ये 36 तासांच्या नवजात बालकाचाही समावेश

शुक्रवारी सीबीआय आणि पोलिसांच्या पथकाने दिल्लीतील केशव पुरम भागातील एका घरावर छापा टाकला होता. दोन दिवस चाललेल्या या छाप्यानंतर सीबीआयने मानवी तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश करत 7 ते 8 नवजात बालकांची सुटका केली. त्याचे वय 10 वर्षांपेक्षा कमी आहे. यामध्ये एका नवजात बाळाचे वय केवळ 36 तास आहे, तर दुसऱ्याचे वय 15 दिवस आहे.

Child Trafficking Racket
Arvind Kejriwal : आता आरोग्य व्यवस्थेवरुन बिघडलं! दिल्ली सरकारने श्वेतपत्रिका आणण्याचा नायब राज्यपालांचा सल्ला

सोशल मीडियावर मुले दत्तक घेण्याची केली जाहिरात

सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंतच्या तपासात असे समोर आले आहे की, आरोपी फेसबुक पेजेस आणि व्हॉट्सॲप ग्रुप्ससारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहिराती देत ​​असत. याद्वारे ते मूल दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या निपुत्रिक जोडप्यांशी संपर्क साधत असत.

निष्पाप बालकांची 4 ते 6 लाख रुपयांना विक्री

यानंतर आरोपी नवजात बालकांना चार ते सहा लाख रुपयांना विकायचे. दत्तक घेण्याबाबत बनावट कागदपत्रे तयार करून अनेक अपत्यहीन जोडप्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोपही आरोपींवर करण्यात आला आहे.

Child Trafficking Racket
पत्नीने वारंवार सासरचे घर सोडून जाणे ही पतीसोबत क्रूरता, हायकोर्टाने दिला महत्वाचा निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.