CBI Raid In Gujrat : मोदींच्या गुजरातमध्ये कर अधिकाऱ्याच्या घरात सापडलं मोठं घबाड

गुजरातच्या गांधीधाममध्ये सीबीआयने ही कारवाई केली आहे.
CBI Raid
CBI Raid Sakal
Updated on

CBI Raid In Gandhidham Gujrat : सीबीआयच्या छापेमारीत गुजरातमध्ये कर अधिकाऱ्याच्या घरात मोठं घबाड आढळून आले आहे.

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

CBI Raid
Smart TV : Xiaomi चा छोटू डिव्हाइस घरातल्या टीव्हीला बनवणार 4k

गुजरातच्या गांधीधाममध्ये सीबीआयने ही कारवाई केली आहे. केंद्रीय गुड अँड सर्व्हिसेस टॅक्सचे (CGST) सहाय्यक आयुक्त महेश चौधरी आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सीबीआयच्या या छापेमारीत चौधरी यांच्या घरात सुमारे 42 लाख रुपयांची रोकड रकेमेसह 3 कोटींहून अधिक किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

सीबीआयच्या म्हणण्यानुसार, सहाय्यक आयुक्त महेश चौधरी यांनी 2017 ते 2021 या वर्षात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, बँक शिल्लक, चल आणि जंगम मालमत्ता त्यांच्या नावावर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर मिळवली.

CBI Raid
Google Loss News : गुगलला 100 बिलियन डॉलर्स फटका बसवणारी नेमकी चूक काय?

सीबीआयच्या म्हणण्यानुसार चौधरी यांनी सुमारे 3,71,12,499 रुपयांची मालमत्ता चुकीच्या पद्धतीने जमा केली असून, हे कर अधिकाऱ्याच्या वास्तविक उत्पन्नापेक्षा खूप जास्त आहे.

CBI Raid
PM Modi : 'जेवढा चिखल टाकाल, तेवढं कमळ फुलेल', विरोधकांवर PM मोदींचा हल्लाबोल

दरम्यान, चौधरी याने बेकायदेशीररीत्या किती संपत्ती मिळवली याचा शोध घेण्यासाठी सीबीआयने गुजरात आणि राजस्थानमधील अनेक ठिकाणी एकाचवेळी छापेमारी केली. त्यावेळी चौधरी याच्या घरातून सुमारे 42 लाख रोख, विदेशी चलन, दागिने, मौल्यवान घड्याळे आणि मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे सापडली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.