केंद्रीय अन्वेषण विभागानं सायबर फसवणुकीविरोधात मोहीम सुरू केली आहे.
CBI Raids : केंद्रीय अन्वेषण विभागानं (CBI) सायबर फसवणुकीविरोधात (Cyber Crime) मोहीम सुरू केलीय. मंगळवारी तपास यंत्रणेनं देशातील 100 हून अधिक ठिकाणी छापे टाकल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे इंटरपोल, फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन यांसारख्या एजन्सींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीबीआयनं कारवाई केलीय.
सायबर गुन्हेगारांविरुद्धच्या मोहिमेचा एक भाग म्हणून सीबीआयनं मंगळवारी अनेक राज्यांमध्ये 115 ठिकाणी छापे टाकले. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिस दलांच्या सहकार्यानं 'ऑपरेशन चक्र' अंतर्गत शोध मोहीम राबविण्यात आली. सीबीआयनं 87 ठिकाणांचा शोध घेतला, तर राज्य आणि केंद्रशासित प्रदेश पोलिसांनी 28 ठिकाणांचा शोध घेतला, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
दिल्लीत पाच ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. तपास यंत्रणेनं राजस्थानमधील राजसमंदमध्ये एका बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. त्याचवेळी पुणे आणि अहमदाबादमध्ये अमेरिकेतील नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या दोन बनावट कॉल सेंटरचाही पर्दाफाश करण्यात आलाय. या प्रकरणांमध्ये 300 हून अधिक संशयितांची चौकशी सुरू आहे. 'ऑपरेशन चक्र'चा एक भाग म्हणून अंदमान आणि निकोबारमध्ये चार, दिल्लीतील पाच, चंदीगडमध्ये तीन, पंजाब-कर्नाटक आणि आसाममध्ये प्रत्येकी दोन ठिकाणी शोधमोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सीबीआयनं या कारवाईची माहिती अमेरिकन तपास संस्था एफबीआयला दिली आहे. इंटरपोल, एफबीआय, रॉयल कॅनेडियन माउंटन पोलिस आणि ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.