नवी दिल्ली: देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांचा हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. आठ डिसेंबर रोजी हा अपघात (Tamil Nadu) झाला होता. या अपघातात एकूण चौदा जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातासंदर्भात संपूर्ण देशाला प्रश्न पडले होते की हा अपघात नेमका झाला कसा? आणि कशामुळे झाला. यासंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. (CDS Bipin Rawat Chopper Crash Reason)
या अपघाताच्या तपासाअंती त्यांनी सांगितलंय की, या संपूर्ण घटनेच्या पाठीमागे कसल्याही प्रकारचा कट होता किंवा कुठला तांत्रिक बिघाड हेलिकॉप्टर होता वा कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष झालं होतं, अशी कोणतीच बाब समोर आलेली नाहीये. तमिळनाडू राज्यातील खोऱ्यातील हवामानात अनपेक्षित बदल झाल्याने हेलिकॉप्टर ढगांमध्ये घुसल्याने हा अपघात झाल्याचे चौकशी पथकाने सांगितलंय. अचानकपणे क्लायमेट बदललं आणि हेलिकॉप्टरचा मार्ग बदलला आणि ते पायलटच्या नियंत्रणात न राहता ढगामध्ये गेल्याने त्याचा मार्ग भटकल्याचा अहवाल समोर आला आहे. या समितीने सगळ्या बाबींची मदत घेऊन, घटनेशी निगडीत लोकांची साक्षही नोंदवली आहे. त्यातूनच हा अहवाल त्यांनी मांडला आहे. हेलिकॉप्टरमध्ये कुठल्याही प्रकारचा तांत्रिक बिघाडकिंवा कटकारस्थान नसल्याची माहिती समोर आली आहे.
हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी आणि एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखालील त्रि-सेवा तपास पथकाचा (tri-service investigation team) हा अधिकृत निष्कर्ष आहे. 5 जानेवारी रोजी त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना चौकशीतील निष्कर्षांची माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.