Helicopter Crash : कुठे निघाले होते बिपीन रावत

सीडीएस बिपीन रावत यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
Bipin Rawat File photo
Bipin Rawat File photoGoogle
Updated on

बंगळुरू : सीडीएस बिपीन रावत (CDS Bipin Rawat) बुधवारी वेलिंग्टन आर्मी सेंटर कुन्नूर (Wellington army centre Coonoor) येथे कॅडेट संवाद कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी गेले होते. त्यानंतर त्यांचे हेलिकॉप्टरला दुपारी 12.20 च्या सुमारास अप्पर कुन्नूरजवळ अपघात झाला. अपघातावेळी हेलिकॉप्टर हेलिपॅडपासून 10 किलोमीटर अंतरावर होते, यावेळी हेलिकॉप्टरमध्ये रावत यांच्यासह 14 प्रवासी उपस्थित होते.

Bipin Rawat File photo
अपघात एवढा भीषण होता की...; हेलिकॉप्टर क्रॅश फोटो व्हायरल

दरम्यान, अपघातस्थळी बचाव कार्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून घटनास्थळी कोईम्बतूर वैद्यकीय महाविद्यालयातील सहा वरिष्ठ डॉक्टर कुन्नूरला दाखल झाले आहेत. (Coimbatore medical college Doctors )या अपघातात चौघाजणांचा मृत्यू झाला असून त्यांची अद्यापपर्यंत ओळख पटू शकलेली नाही. तर जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सीडीएस बिपीन रावत यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

Bipin Rawat File photo
कोण आहेत बिपीन रावत

हेलिकॉप्टरमध्ये कोण प्रवास करत होते

अपघातग्रस्त झालेल्या हेलिकॉप्टमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिखा रावत, ब्रिगेडियर एल. एस. लिडेर, लेफ्टिनेंट कर्नल हरजिंदर सिंह, एन.के. गुरसेवक सिंह, एन.के. जितेंद्र कुमार, L/NK विवेक कुमार, L/NK बी. तेजा, हवालदार सतपाल आदी या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते.

अपघाताच्या चौकशीचे आदेश

सीडीएस बिपन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्यानंतर हवाई दलाने चौकशीचे आदेश (Helicopter Crash inquiry ) दिले आहेत. या हेलिकॉप्टरमधून रावत यांच्या पत्नीसह लष्कराचे वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु असून या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून अद्याप त्यांची ओळख पटविण्यात आलेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()