देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूतील कुन्नूर येथे आज झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात ते, पत्नी मधुलिका रावत आणि इतर 11 अधिकारी आणि सहकारी ठार झाले. या अपघातातून हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे एकमात्र बचावले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या देशाला हदरवून सोडणाऱ्या अपघातानंतर सर्वत्र बिपीन रावत यांनी केलेल्या आजवरच्या कामाची चर्चा होत आहे, या दरम्यान त्यांनी त्यांच्या शेवटच्या भाषणात देशासाठी काही महत्वाच्या गोष्टी सांगीतल्या होत्या. आपण त्यावर एक नजर टाकूयात.
बिपीन रावत यांनी बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी-सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन (BIMSTEC) सदस्य देशाांच्या आपत्ती व्यवस्थापन सराव पॅनेक्स 21 च्या उद्घाटन प्रसंगी शेवटचे भाषण केले होते, BIMSTEC देशांनी ज्यामध्ये बांगलादेश, भूतान, भारत, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार आणि थायलंड यांचा समावेश होतो, जैविक युद्धाविरुद्धापासून सावध राहण्याची इशारा दिला होता, येत्या काळात जैविक युध्द हा युध्दाचा नवीन प्रकार असल्याचे सांगत भविष्यात या प्रकारच्या युध्दाच्या धोक्यापासून बचावासीठी सर्व देशांनी तयारी करणे आवश्यक असल्याचे म्हणाले होते.
जनरल रावत यांनी, जर जैविक युद्ध होणार असेल, तर या विषाणू आणि आजारांनी आपली राष्ट्रे बाधित होणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी आपण आपली योजना एकत्र राबवली पाहिजे असे अवहान सदस्य देशांना केले होते. सोबतच प्रत्येक देशाने स्वतःला बळकट केले पाहिजे, त्या बरोबरच जर व्हायरस इतर स्वरूपात बदलणार असेल, तर त्यासाठी आपण तयार राहावे लागेल, सर्वांनी एकत्र येत कोणत्याही परिस्थितीत एकमेकांना साथ देणे खूप महत्वाचे असल्याचे ते म्हणाले होते.
यापुढे रावत यांनी बोलताना, देशातील कोरोना महामारी सारख्या आरोग्याशी संबंधित आपत्तींच्या काळात जगातील सशस्त्र दलांनी त्यांच्या नागरिकांच्या मदतीसाठी विशेष तयारी केली पाहिजे असे देखील याप्रसंगी सांगीतले होते.
बिपीन रावत यांच्या मृत्यूनंतर देशभरात शोक व्यक्त केला जात आहे, जनरल बिपीन रावत आज तमिळनाडूच्या निलगीरी पर्वत रांगेतील डिफेन्स सर्विस स्टाफ कॉलेज विलींग्टन इथं मार्गदर्शनासाठी गेले होते. मात्र, तमिळनाडूतील कुन्नूरजवळ त्यांचा अपघात झाला. रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मधूलिका, ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नायक गुरूसेवक सिंग, नायक जितेंद्र सिंग, लान्सनायक विवेक कुमार, लान्सनायक बी. साई. तेजा, हवालदार सतपाल हेही असल्याची माहिती समोर आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.