कोण आहेत बिपीन रावत

बिपिन रावत यांनी 31 डिसेंबर 2019 रोजी कार्यभार स्विकारला.
बिपीन रावत
बिपीन रावतEsakal
Updated on
Summary

भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला तामिळनाडुत अपघात झाला.

पुणे : भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला तामिळनाडुत अपघात झाला. यामध्ये त्यांच्यासोबत १४ जण प्रवास करत होते. बिपिन रावत हे जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जनरल बिपिन रावत यांची भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून 31 डिसेंबर 2019 नियुक्ती करण्यात आली. सध्या त्यांच्याकडेच CDS पदाचा कार्यभार आहे. संरक्षण दलांना बळकटी देण्यासाठी आणि तिन्ही दलांमध्ये योग्य समन्वय आखण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद निर्माण करण्यात आले आहे. जनरल बिपिन रावत यांचा जन्म 16 मार्च 1958 रोजी झाला. 15 ऑगस्ट 2019 रोजी भारताच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संरक्षण दलांना बळकटी देण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पद तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले होते.

31 डिसेंबर 2019 रोजी भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून जनरल बिपिन रावत यांनी कार्यभार स्विकारला आहे. यापूर्वी भारताचे 26 वे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती झालेल्या रावत सप्टेंबर 2016 मध्ये जबाबदारी स्वीकारली होती. 2016 मध्ये लष्कराचे उपमुख्याधिकारी म्हणून तोपर्यंत ते लष्कराचे उपमुख्याधिकारी म्हणून आणि त्यापूर्वी ते पुण्यातील सदर्न कमांडचे GOC इन कमांड होते.

लेफ्टनंट जनरल रावत डिसेंबर 1978 मध्ये सैन्यात दाखल झाले. '11 गोरखा रायफल्स'च्या पाचव्या तुकडीतून त्यांनी लष्करी सेवेला सुरुवात केली होती. 1986 मध्ये चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर त्यांनी पायदळाची धुरा संभाळली आहे. 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धानंतर सैन्य दलांमध्ये योग्य समन्वय राखला जावा यासाठी असा प्रकारचे पद निर्माण करण्याची शिफारस करण्यात आली होती. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सैनिकी मोहिमेदरम्यान तिन्ही दलांमध्ये समन्वय राखण्याचे काम करेल.

सीडीएस स्टार जनरल असेल आणि सैन्य व्यवहार विभागाचे सचिव म्हणून काम करेल. केंद्र सरकारने हे स्पष्ट केले की, सीडीएस थेट सेना, वायु सेना आणि नौदलाच्या कमांड आणि युनिट्सवर नियंत्रण ठेवणार नाही. परंतु त्या अंतर्गत सैन्याच्या तीन भागाची समान कमांड व विभागणी होईल. सध्या अंदमान निकोबार कमांड ही ट्राय सेवा कमांड आहे जी आता सीडीएस अंतर्गत काम करेल. याव्यतिरिक्त, स्पेशल ऑपरेशन्स फोर्सेस विभाग (आर्मर्ड फोर्सेस स्पेशल ऑपरेशन्स विभाग) आणि डिफेन्स सायबर एजन्सीसह स्पेस सायबर एजन्सी आता सीडीएस अंतर्गत काम करतील.

राष्ट्रीय रायफल्स आणि काश्मीर खोऱ्यात लष्करी तुकडीचं नेतृत्व केलं आहे. भारतीय लष्करात ब्रिगेडपदी असताना रावत यांनी काँगो येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता मोहिमेच्या बहुराष्ट्रीय ब्रिगेडचे नेतृत्व केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()