Chopper Crash : चूक इथं झाली? लवकरच समोर येणार अहवाल

हेलिकॉप्टर दुर्घटनेची चौकशी झाली पूर्ण
CDS Bipin Rawat Helicopter Crash
CDS Bipin Rawat Helicopter CrashEsakal
Updated on

नवी दिल्ली : भारताचे संरक्षण दल प्रमुख (CDS) जनरल बिपिन रावत यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेची चौकशी पूर्ण झाली आहे. यानंतर याच जानेवारी महिन्यात याचा अंतिम अहवाल एअरफोर्स प्रमुखांना सुपूर्द केला जाईल. यातून या अपघाताचं नेमकं कारणही समोर येणार आहे, असं वृत्त संरक्षण विभागातील सुत्रांच्या हवाल्यानं इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे. (CDS chopper crash Probe report in January unintentional error likely cause)

CDS Bipin Rawat Helicopter Crash
मुलांच्या लसीकरणाला मोठा प्रतिसाद, पहिल्याच दिवशी लाखोंची नोंदणी

एअरफोर्सनं याबाबत अधिकृतरित्या अद्याप काहीही म्हटलेलं नाही. पण संरक्षण विभागातील सुत्रांच्या माहितीनुसार, या अपघातामागे मानवी किंवा तांत्रिक चूक असण्याची शक्यता नाही. पण कन्ट्रोल्ड फ्लाइट इनटू टेरेन (CIFT) मुळं ही दुर्घटना घडल्याचं प्राथमिक तपासातून दिसून येत आहे. CIFTमध्ये पायलट अनावधानानं एखाद्या वस्तूवर आदळतो.

CDS Bipin Rawat Helicopter Crash
सोमवारपासून 'या' वयोगटातील मुलांचे लसीकरण; पहिल्या दिवशी देणार ४ हजार डोस

CIFT म्हणजे हेलिकॉप्टर हवेत उडण्यायोग्य होते आणि पायलटची चूक नव्हती, असं सूत्रांचं म्हणणं आहे. या प्रकरणात, कुन्नूर परिसरात जिथं हा अपघात झाला तिथल्या खराब हवामानामुळं दृश्यमानता कमी होणं हे एक कारण असू शकतं. CIFT हे जागतिक स्तरावर विमान अपघातांचं एक प्रमुख कारण आहे. एअरफोर्सनं याबाबत म्हटलं की, अंतिम अहवालातूनच अपघाताच्या तपशीलावर प्रकाश पडेल.

CDS Bipin Rawat Helicopter Crash
राज्यात आज 9170 कोरोना बाधित, तर 6 ओमिक्रॉन बाधितांची नोंद

ट्राय सर्व्हिस कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे नेतृत्व एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्याकडे आहे. जे सशस्त्र दलातील देशातील सर्वोच्च हेलिकॉप्टर पायलट आहेत. न्यायालयीन चौकशी हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी केली होती. याबाबतचा अहवाल सुपूर्द करण्यापूर्वी, चौकशीमध्ये सर्व प्रोटोकॉलचे पालन केले गेले आहे की नाही याची खात्री करण्यासाठी निष्कर्षांची कायदेशीररित्या तपासणी केली जाईल. अपघातानंतर लगेचच हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स जप्त करण्यात आला होता. तसेच फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरही (CVR) तपासण्यात आला होता.

नक्की कसा घडला होता अपघात?

सीडीएस जनरल रावत हे आपली पत्नी आणि इतर १२ अधिकाऱ्यांसोबत वायुसेनेच्या Mi-17v5 हेलिकॉप्टरमधून वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये एका कार्यक्रमासाठी निघाले होते. 8 डिसेंबर रोजी हेलिकॉप्टर उतरत असताना खराब हवामानामुळं त्याचा अपघात झाला होता.

या अपघातानंतर 9 डिसेंबर रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत माहिती दिली होती की, हेलिकॉप्टरने सकाळी 11.48 वाजता सुलूर हवाई तळावरून उड्डाण केले आणि दुपारी 12.15 पर्यंत वेलिंग्टन येथे उतरणे अपेक्षित होते. सुलूर हवाई तळावरील हवाई वाहतूक नियंत्रणाचा हेलिकॉप्टरशी दुपारी १२.०८ वाजता संपर्क तुटला. स्थानिक रहिवाशांना कुन्नूरजवळील जंगलात आग लागल्याचे दिसले आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली जिथे त्यांनी हेलिकॉप्टरचे अवशेष आगीच्या भक्षस्थानी पडल्याचं त्यांनी पाहिलं होतं, असंही राजनाथ सिंह यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.