Census: देशात लवकरच सुरू होणार जनगणना, लोकसभा मतदारसंघही बदलणार; काय आहेत यंदाच्या जनगणनेची वैशिष्ट्ये

Census To Start From 2025: दरम्यान, अनेक विरोधी पक्षांनी मागणी केलेल्या जात जनगणनेबाबत सरकारचा अद्याप निर्णय झालेला नाही.
Census 2025
Census 2025sakal
Updated on

गेल्या चार वर्षांपासून लांबणीवर पडलेली जनगणना पुढील वर्षीपासून सुरू होणार असून, ती वर्षभर सुरू राहील. 2021 मध्ये होणारी जनगणना कोविड-19 महामारीमुळे लांबणीवर पडली होती. आता जनगणना 2025 पासून सुरू होऊन 2026 पर्यंत सुरू राहील, असे सूत्रांनी सांगितले.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, आता जनगणनेचे चक्रही बदलणार आहे. दर 10 वर्षांनी होणारी जनगणना पुढे 2035 मध्ये होणार आहे. आतापर्यंत दर 10 वर्षांनी होणारी जनगणना दशकाच्या सुरुवातीला होत असे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.