Railway : रेल्वेप्रवास होणार ‘दिव्यांग’फ्रेंडली! केंद्राच्या मार्गदर्शक सूचना; सुविधांना मिळणार तंत्रज्ञानाचा आधार

यात ‘टेक्स्ट-टू- स्पीच’ आणि ‘यूजर फ्रेंडली पिक्टोग्राम’वर भर देण्यात आला आहे. दिव्यांग विभागाने या मार्गदर्शक तत्त्वांबाबत विविध घटकांकडून २९ जानेवारीपर्यंत काही सूचना आणि हरकती मागविल्या आहेत.
Railway Divyang Friendly
Railway Divyang FriendlyeSakal
Updated on

Center issues Guidelines for Railway : दिव्यांग प्रवाशांना रेल्वेतून प्रवास करणे अधिक सुकर व्हावे म्हणून केंद्र सरकारने काही नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. रेल्वे स्थानकापर्यंतचा प्रवास, तेथील सोयी-सुविधा आदींची माहिती प्रवाशांना कशी मिळेल? यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

आता तंत्रज्ञानावर आधारित फिचर्सचे एकत्रीकरण केले जावे, असे सरकारकडून सूचित करण्यात आले. यातही ‘टेक्स्ट-टू- स्पीच’ आणि ‘यूजर फ्रेंडली पिक्टोग्राम’वर भर देण्यात आला आहे. दिव्यांग विभागाने या मार्गदर्शक तत्त्वांबाबत विविध घटकांकडून २९ जानेवारीपर्यंत काही सूचना आणि हरकती मागविल्या आहेत.

रेल्वेचा प्रवास अधिक सुलभ व्हावा, या उद्देशाने हे बदल करण्यात येतील. दिव्यांग प्रवाशांना रेल्वेमध्ये जागेवरच भोजन आणि अन्य खाद्यपदार्थ मिळावेत म्हणून वेगळे संकेतस्थळ तयार करण्याची सूचना करण्यात आली आहे. या संकेतस्थळाचा इंटरफेस आणि त्याचे डिझाईन अधिक यूजर फ्रेंडली, असावे असे सूचित करण्यात आले आहे. या सगळ्या फिचर्ससाठी ‘वर्ल्ड वाइड वेब कन्सोर्टियम’ने तयार केलेली मार्गदर्शक तत्त्वे आणि डिझाईनचा अवलंब करण्यात येईल.

Railway Divyang Friendly
Bike Parcel : दुसऱ्या शहरात शिफ्ट होताय? रेल्वेने अशी नेता येईल तुमची दुचाकी; जाणून घ्या प्रक्रिया

दिव्यांग प्रवाशांसाठी वेगळे मोबाईल ॲप तयार करण्याची सूचनाही सरकारकडून करण्यात आली असून त्यांना ‘वन क्लिक टेम्पलेट’वर रेल्वे स्थानकावर उपलब्ध असलेल्या सोयी- सुविधांबरोबरच प्रत्यक्ष गाडीमध्येही उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयींची माहिती दिली जाणार आहे. प्रत्यक्ष रेल्वे स्थानके आणि प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या सोयी सुविधांची माहिती सार्वजनिक उद्‍घोषणेच्या माध्यमातून देण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय ‘डिजिटल डिस्प्ले’वर देखील या सूचना पाहायला मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.