नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून राज्यात नव्याने कोरोना (Corona ) बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत असताना केंद्राने राज्याला पत्र पाठवून काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सलग हजारांपुढे कोरोना बाधितांची नोंद करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. दरम्यान, राज्यातील सहा जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असून या ठिकाणी टेस्टिंग,लसीकरण वाढवणे यावर अधिक भर द्यावा असा सल्ला दिला आहे. केंद्राचे आरोग्य सचिन राजेश भूषण यांनी राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांना पत्र पाठवून वरील सूचना दिल्या आहेत. (Center Health Minister Letter To State On Corona Cases Hike )
गेल्या काही दिवसांपासून मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, रायगड, पालघर या जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित होणाऱ्यांची संख्या अधिक या जिल्ह्यांनी राज्याच्या चिंतेत भर टाकली आहे. त्यामुळे वाढत्या रूग्णसंख्येच्या जिल्ह्यांमध्ये टेस्टिंग, लसीकरण वाढवण्यावर भर देण्याच्या सूचना राज्याला देण्यात आल्या आहेत. तसेच कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवरदेखील बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
"निर्बंध नको असतील तर मास्क वापरा"; मुख्यमंत्र्यांचा जनतेला इशारा
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने (Corona) डोकं वर काढले असून, गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ पाहण्यास मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांना पुन्हा निर्बंध नको असतील तर, स्वतःहून शिस्त पाळा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddav Thackeray) यांनी नागरिकांना केले आहे. वाढत्या रूग्णसंख्येवर राज्य शासन पुढील पंधरा दिवस लक्ष ठेवून असेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी काल कोविड टास्क फोर्स समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी वरील सूचना दिल्या आहेत.
मुंबई, ठाणे, पुणे तसेच महानगर क्षेत्रात राज्याच्या एकूण रुग्ण संख्येच्या 97 टक्के रुग्ण आहेत. मुंबईचा पॉझिटीव्हीटी रेट 6 टक्के असून राज्याच्या रेटमध्ये वाढ झाली असून तो 3 टक्के झाल्याचे व्यास यांनी यावेळी सांगितले. या बैठकीदरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड कालावधीत उभारण्यात आलेली फिल्ड रुग्णालये सज्ज ठेवण्याच्या आणि ते व्यवस्थित आहेत हे पाहण्याचेही निर्देश दिले आहेत. याशिवाय या रूग्णालयांचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यासोबतच कोविड चाचण्यांचे प्रमाण कमी झाले असून तेवाढविण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.