नवी दिल्ली : शाळा आणि अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये मुलांची सुरक्षा निश्चित करण्यासाठी शालेय सुरक्षा आणि संरक्षणासंबंधी ‘पॉक्सो’नुरुप विकसित केलेल्या २०२१ च्या मार्गदर्शक तत्त्वांची सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या शाळांमध्ये अमलात आणावे, असे निर्देश आज केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिले.