Ram Mandir Inauguration: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे

22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या भव्य सोहळ्यासाठी देश-विदेशातील हिंदूंमध्ये मोठा उत्साह आहे. या दिमाखदार कार्यक्रमात पंतप्रधान मोदींसह अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.
Ram Mandir Inauguration
Ram Mandir Inauguration
Updated on

Ram Mandir Inauguration:

22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या भव्य सोहळ्यासाठी देश-विदेशातील हिंदूंमध्ये मोठा उत्साह आहे. या दिमाखदार कार्यक्रमात पंतप्रधान मोदींसह अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे.

केंद्र सरकारने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने भारतभरातील सर्व केंद्र सरकारची कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक प्रतिष्ठान येथे 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 2:30 वाजेपर्यंत अर्धा दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. (Ayodhya Ram Mandir News in Marathi)

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, लोकांमध्ये असलेला प्रचंड उत्साह पाहता केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये 22 जानेवारीला अर्ध्या दिवसाच्या सुट्टीचा निर्णय घेण्यात आला आहे.

Ram Mandir Inauguration
Ayodhya Ram Mandir : अयोध्येशी हिंदूंचे नाही तर, शीख अन् जैन धर्माचे ही आहे खास नाते

यापूर्वी अनेक राज्यांतील शाळा आणि इतर संस्थांना सुटी जाहीर करण्यात आली होती. अयोध्याराम मंदिर अभिषेक सोहळ्यासाठी अनेक राज्यांनी सुटी जाहीर केली आहे. या दिवशी शाळा आणि कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

राम मंदिरात 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी विधी केले जात आहेत. राम मंदिर ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 जानेवारीपर्यंत विधी सुरू राहणार असून रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आवश्यक असलेले प्रत्येक विधी प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी केले जातील. (Latest Marathi News)

राम मंदिर 'प्राणप्रतिष्ठा' कार्यक्रम 22 जानेवारी रोजी दुपारी 12.20 वाजता सुरू होईल आणि दुपारी 1 वाजता संपेल. 20 आणि 21 जानेवारीला राम मंदिर बंद राहणार आहे. 23 जानेवारीपासून रामभक्तांना पुन्हा एकदा परमेश्वराचे दर्शन घेता येणार आहे.

Ram Mandir Inauguration
Maratha Reservation : जरांगे पाटलांनी इशारा देताच मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले 'हे' आदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.