नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण (Union Health Secretary Rajesh Bhushan) यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात कोरोनाव्हायरसच्या (Corona Cases In India) वाढत्या प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार ओमिक्रॉनच्या (Omicron) वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राने राज्यांना तात्पुरती रुग्णालये स्थापन करण्यास, होम आयसोलेशनवर देखरेख वाढवण्यास आणि विशेष पथके स्थापन करण्यास सांगितले आहे. (Union Health Secretary Rajesh Bhushan issued new guidelines to all states and UTs)
देशातील कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांचा आकडा 22 हजारांच्या पुढे गेला आहे. दुसर्या लाटेनंतर (Corona Second Wave) देशातील कोरोनाची रूग्णसंख्या सहा हजारांवर आली होती, परंतु ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंटनंतर ही रूग्णसंख्या पुन्हा वेगाने वाढू लागली आहे. ख्रिसमस, नववर्षानिमित्त बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणी प्रचंड गर्दी होत असल्याने यामध्ये झपाट्याने वाझ होत आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये ओमिक्रॉनसह कोविड बाधितांमध्ये मोठी वाढ झाली आहे. (Health Secretary Advised To initiate Setting Up Temporary Hospitals)
देशातील ओमिक्रॉन (Omicron Count In India) बाधितांची संख्या 1431 वर गेली असून सर्वाधिक रूग्णसंख्या महाराष्ट्रात नोंदविण्यात आली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 454 ओमिक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आली असून त्या खालोखाल राजधानी दिल्लीचा नंबर आहेय येथे आतापर्यंत 351 ओमिक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आली आहे. या सर्व गोष्टींनंतर आणि भविष्यातील संंभव्या धोका लत्रात घेत सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना आरोग्य सचिवांनी तात्पुरती रुग्णालये स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा आणि वाढणाऱ्या रूग्णसंख्येवर देखरेख ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा सल्ला दिला आहे. ओमिक्रॉनच्या वाढती रूग्णसंख्या पाहता अनेक राज्यामध्ये पुन्हा नव्याने निर्बंध लागून करण्यात आले असून अनेक ठिकाणी रात्रीच्या संचारबंदीसह जमावबंदीची घोषणा करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.