सामान्यांना झटका! केंद्राने दोन विमा योजनांचा प्रीमियम वाढवला

नवीन प्रीमियम दर 1 जून 2022 पासून लागू होणार आहेत.
pmsby
pmsbysakal
Updated on

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मंगळवारी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्या (PMSBY) प्रीमियममध्ये वाढ केली आहे. या दोन्ही विमा योजना केंद्र सरकारच्या प्रमुख विमा योजनांमध्ये समाविष्ट आहेत. केंद्र सरकारने याबाबत अधिकृत निवेदन जारी केले असून, नवीन प्रीमियम दर 1 जून 2022 पासून लागू होणार आहेत. (Central Government Raises Premium Of PMJJBY And PMSBY)

केंद्र सरकारने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा प्रीमियम प्रतिदिन 1.25 रुपये केला आहे, त्यामुळे यासाठी नागरिकांना 330 रुपयांऐवजी 436 रुपये प्रतिवर्षाला भरावे लागणार आहेत. निवेदनानुसार, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा वार्षिक प्रीमियम 12 रुपयांवरून 20 रुपये करण्यात आला आहे. निवेदनानुसार, PMJJBY साठी प्रीमियममध्ये 32 टक्के आणि PMSBY साठी 67 टक्के वाढ झाली आहे.

गेल्या सात वर्षांपासून कोणतीही वाढ नाही

31 मार्च 2022 पर्यंत PMJJBY आणि PMSBY अंतर्गत अनुक्रमे 6.4 कोटी आणि 22 कोटी विमाधारकांनी नोंदणी केली आहे. या दोन्ही योजनांतील दावे थेट लाभ हस्तांतरण (DBT) मार्गाने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. या योजना सुरू झाल्यापासून गेल्या सात वर्षांत प्रीमियम दरांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

पंतप्रधान मोदींची महत्वाकांक्षी योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 9 मे 2015 रोजी सुरू करण्यात आली. प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना ही एक वर्षाची जीवन विमा योजना आहे. दरवर्षी त्याचे नूतनीकरण करावे लागते. ही योजना खरेदी केल्यावर, व्यक्तीच्या मृत्यूनंतर, त्याच्या कुटुंबातील सदस्यांना 2 लाख रुपये दिले जातात. हा टर्म प्लॅन घेण्यासाठी तुमचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल 50 वर्षे असणे गरजेचे आहे. भारतातील कोणताही नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो. या योजनेचे परिपक्वतेचे वय 55 वर्षे आहे. PMJJBY बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते असलेल्या 18-50 वयोगटातील व्यक्तीचा कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाल्यास 2 लाख रुपयांचे जीवन विमा संरक्षण प्रदान केले जाते.

pmsby
LICची नवी 'विमा रत्न पॉलिसी' लाँच, अधिक जाणून घेऊयात...

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही देखील सरकारी विमा योजना आहे. याद्वारे एखाद्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. या दोन्ही योजनांमध्ये, ऑटो डेबिट प्रणालीद्वारे पॉलिसी खरेदीदाराच्या खात्यातून प्रीमियम घेतला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.