गृहमंत्री शहांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री मान आशावादी; म्हणाले...

Central Government to provide 2000 additional paramilitary forces to Punjab
Central Government to provide 2000 additional paramilitary forces to PunjabCentral Government to provide 2000 additional paramilitary forces to Punjab
Updated on

केंद्र सरकार पंजाबला २,००० अतिरिक्त निमलष्करी दल देत आहे. निमलष्करी दलाचे जवान पंजाबमध्ये सुरक्षा वाढवण्यासाठी तैनात केले जातील. कारण, काही घटक राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याची नियमित माहिती मिळत होती, असे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी गुरुवारी (ता. १९) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर सांगितले. (Central Government to provide 2000 additional paramilitary forces to Punjab)

गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतल्यानंतर मान यांनी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन मिळाल्याचे सांगितले. काही घटक पंजाबमध्ये संकट निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याची नियमितपणे माहिती मिळत आहे. राज्याच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त दल मंजूर करण्याची विनंती गृहमंत्र्यांना केली. निमलष्करी दलाच्या १० कंपन्या आधीच पंजाबमध्ये पोहोचल्या आहेत. इतर १० कंपन्यांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून लवकरच मान्यता दिली जाईल, असेही मान (Bhagwant Mann) यांनी सांगितले.

Central Government to provide 2000 additional paramilitary forces to Punjab
हार्दिक पटेलचा घणाघात; काँग्रेसने ना कधी कामाची संधी दिली, ना काम

निमलष्करी दलाच्या एका कंपनीत सुमारे १०० जवान असतात. राष्ट्रीय सुरक्षेशी कोणतीही तडजोड केलेली नाही. ती पक्षीय राजकारणाच्या वर आहे. केंद्र सरकार पंजाब सरकारला सर्वतोपरी मदत करेल, असे गृहमंत्र्यांनी (Amit Shah) सांगितल्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले. सीमेपलीकडून ड्रोनद्वारे होत असलेल्या शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्याबाबत गृहमंत्र्यांना अवगत केले आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारची मदत मागितल्याचे मुख्यमंत्र्यांनी (Bhagwant Mann) सांगितले.

सूत्रांनी सांगितले की, ऑपरेशन ब्लू स्टारच्या ३८ व्या वर्धापन दिनापूर्वी सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. अमृतसरमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. १ ते ८ जून १९८४ दरम्यान सुवर्ण मंदिर परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांना हुसकावून लावण्यासाठी लष्कराने ऑपरेशन ब्लू स्टार सुरू केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.