येत्या काळात केंद्र सरकार शेतकऱ्यांना आधार कार्डसारखे युनिक ओळखपत्र वाटप करणार आहे. कृषी सचिव देवेश चतुर्वेदी यांनी नुकतीच ही माहिती दिली. ते म्हणाले की, कृषी क्षेत्राचे डिजिटलायझेशन करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून सरकार लवकरच देशभरातील शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करणार आहे जेणेकरून त्यांना आधार प्रमाणेच एक युनिक ओळखपत्र (ID) जारी करता येईल.
ॲग्री-टेक समिट निमित्ताने बोलताना चतुर्वेदी म्हणाले की, नोंदणी प्रक्रियेसाठी लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात त्यावर काम सुरू होईल.