''वक्फ केवळ शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवरच नव्हे, तर पुरातन वास्तू विभागाच्या वारसास्थळांवरही दावा करत आहे. या सर्व घडामोडींची सत्यता जाणून घेऊन अहवाल देऊ.''
बंगळूर : केंद्र सरकार (Central Government) ‘वक्फ कायदा-२०२४’ मध्ये (Waqf Board Act-2024) सुधारणा करणार आहे. खासदार तेजस्वी सूर्या यांनी कर्नाटकातील समस्यांकडे लक्ष वेधले आहे. दिल्लीसारख्या राज्यातील शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाकडूनही अडचणी येत आहेत, असे वक्फ दुरुस्ती कायद्यावरील संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी सांगितले. राज्यात प्रशासनाच्या सहकार्याने जमिनीच्या नोंदीमध्ये बदल करण्यात येत असल्याचा त्यांनी आरोप केला.