नवी दिल्ली : भारतात आता १५ ते १८ वयोगटातील मुलांना लसीकरण (Children vacciantion) सुरु होत आहे. तसेच आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन वर्कर्स (HCWs&FLWs) आणि ६० वर्षांवरील आजारी ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस (precaution dose) देण्यात येणार आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटच्या (Omicron Variant) वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील संपूर्ण नियमावली केंद्र सरकारने सोमवारी जाहीर केली. (Central Govt announces New guidelines vaccination of children booster dosage)
लसींचा प्राधान्यक्रम काय असेल? कधी मिळणार बूस्टर डोस?
१५ ते १८ वयोगटातील मुलांना येत्या ३ जानेवारी २०२२ पासून लसीकरण सुरु होत आहे. या लाभार्थ्यांना केवळ लहान मुलांसाठी असलेली कोव्हॅक्सिनची लस देण्यात येणार आहे.
आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन वर्कर्सना येत्या १० जानेवारी २०२२ पासून बूस्टर डोस देण्यात येणार आहे. पण त्यांनी दुसरा डोस घेऊन ९ महिने (३९ आठवडे) पूर्ण झालेल्यांनाच हा बूस्टर डोस घेता येणार आहे.
आणि ६० वर्षांवरील नागरिक जे गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत, अशांना १० जानेवारी २०२२ पासूनच बूस्टर डोस देण्यात येणार आहे. पण या लोकांना सरसकट बूस्टर डोस मिळणार नाही. तर त्यांच्या डॉक्टरांनी जर सुचवलं की त्यांना बूस्टर डोसची गरज आहे तरच अशा नागरिकांना बूस्टर डोस घेता येणार आहे. पण त्यासाठी देखील या नागरिकांनी दुसरा डोस घेऊन ९ महिने (३९ आठवडे) पूर्ण झालेले असणं गरजेचं आहे.
बूस्टर डोससाठी कशी असेल कोविन सिस्टिम?
आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन वर्कर्स आणि ६० वर्षांवरील गंभीर आजार असलेले जे नागरिक बूस्टर डोससाठी पात्र आहेत त्यांना त्यांच्या सध्याच्या कोविन अकाउंटवरुनच बूस्टर डोस घेता येणार आहे.
कोविन सिस्टिममध्ये बूस्टर डोससाठी पात्र असलेल्या नागरिकांनी दुसरा डोस कोणत्या तारखेला घेतला आहे, त्यावरुनच त्यांना बूस्टर डोस घेता येणार आहे.
बूस्टर डोससाठी पात्र असलेल्या नागरिकांना दुसऱ्या डोसनंतर जेव्हा त्यांची या बूस्टर डोससाठी तारीख ड्यू असेल त्यापूर्वी कोविन सिस्टिममकडून एसएमएस पाठवण्यात येईल.
बूस्टर डोससाठी ऑनलाइन आणि थेट लसीकरण केंद्रावर नोंदणी करता येणार आहे.
बूस्टर डोस घेतल्यानंतर लाभार्थ्यांच्या लस प्रमाणपत्रावर त्याचा तसा स्पष्ट उल्लेख असेल.
१५ ते १८ वयोगटातील लाभार्थ्यांसाठी कशी असेल कोविन सुविधा?
ज्या मुलांचं वय हे १५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असेल तसेच ज्यांचं जन्म वर्ष २००७ किंवा त्यापूर्वीचं असेल ते सर्व लस घेण्यात पात्र असून त्यांना कोविन पोर्टलवर नोंदणी करता येईल.
कोविनवरील सध्याच्या अकाऊंटवरुन किंवा नव्यानं अकाउंट तयार करुन या लाभार्थ्यांना नोंदणी करता येईल. यासाठी त्यांना युनिक मोबाईल क्रमांक द्यावा लागेल. सध्याच्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी ही सोय उपलब्ध असेल.
या लाभार्थ्यांना थेट लसीकरण केंद्रावर जाऊनही फॅसिलिटी रजिस्ट्रेशन मोडद्वारे नोंदणी करता येईल.
लहान मुलांच्या लसीकरणासाठी ऑनलाइन किंवा ऑनसाईट (वॉकइन) नोंदणी करता येणार आहे.
१५ ते १८ वयोगटातील मुलांना केवळ कोव्हॅक्सिन लसंच देण्यात येणार आहे. कारण याच लसीला सध्या परवानगी देण्यात आली आहे.
ही नियमावली ३ जानेवारी २०२२ पासून लागू होणार असून वेळोवेळी तिच्यात सुधारणा केली जाईल, असंही केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.