Coronavirus: कोरोनासंदर्भात केंद्राचा महत्वाचा निर्णय; जाहीर केल्या मार्गदर्शक सूचना

केंद्र सकारनं सर्व राज्यांना यांसदर्भात पत्र लिहिलं असून महत्वाचे निर्देश दिले आहेत.
Coronavirus
Coronavirus
Updated on

नवी दिल्ली : कोरोना संसर्गानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून चीन आणि अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर याची प्रकरण दिसून येत आहेत. याच्या काही धक्कदायक बाबीही माध्यमातून समोर आल्या आहेत. यापार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून भारतातही केंद्र सरकारनं राज्यांसाठी पत्राद्वारे मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. (Central govt big decision regarding Coronavirus new Guidelines published for states)

सध्या कोरिया, जपान, अमेरिका आणि चीनमध्ये वाढती कोरोनाची प्रकरणं पाहता केंद्रानं एक मार्गदर्शक तत्वे जाहीर केले आहेत. यासंदर्भात केंद्रानं राज्यांना एक पत्र लिहिलं असून यामध्ये जिनोम सिक्वेंसिंगसाठी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे अहवाल पाठवायला सांगितले आहेत. आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी NCDC आणि ICMR ला देखील याबाबत पत्र लिहिलं आहे. यामध्ये देखील जिनोम सिक्वेंसिंगवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आलं आहे.

Coronavirus
NIT Land Scam: "खोदा पहाड, चुहा भी नही निकला"; CM शिंदेंसाठी फडणवीसांची बॅटिंग

जिनोम सिक्वेसिंगद्वारे कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची माहिती मिळू शकेल. केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्ये आणि केंद्रसाशित प्रदेशांना एक पत्र लिहून जपान, अमेरिका, कोरिया, ब्राझील आणि चीनमध्ये कोरोनाच्या प्रकरणात अचानक वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील पॉझिटिव्ह प्रकरणांच्या सँपल्सची जिनोम सिक्वेंसिंग गरजेची असल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा: असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

भारतात स्थिती सामान्य

देशात कोरोनाची प्रकरणं अद्याप सामान्य आहेत. केंद्राच्या आरोग्य खात्यानं मंगळवारी २० डिसेंबर रोजी जाहीर केलेल्या आकड्यांनुसार, गेल्या २४ तासांत देशात ११२ नवी प्रकरणं समोर आली आहेत. तसेच अॅक्टिव्ह प्रकरणांतही घट झाली आहे. आता देशात कोरोनाच्या अॅक्टिव्ह प्रकरणांची संख्या ३४९० राहिली आहे. गेल्या चोवीस तासात कोरोनाच्या संसर्गानं तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मार्च २०२० नंतर दैनंदिन कोविडच्या प्रकरणात मृतांची संख्या सर्वात कमी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()