मंडावियांच्या घोषणेचे आरोग्य संघटनेकडून काैतुक

पुढील महिन्यात भारतातून लसीची निर्यात
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडावियाsakal
Updated on

नवी दिल्ली : पुढील महिन्यात भारतातून अतिरिक्त लशीची निर्यात करण्याची केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी केलेल्या घोषणेचे जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले आहे. यावर्षाखेरीस जगातील सर्व देशांचे किमान ४० टक्के लसीकरण करण्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या ध्येयपूर्तीच्या प्रयत्नांत हा निर्णय महत्त्वाचा आहे, असे आरोग्य संघटनेचे महासंचालक ट्रेड्स घ्रेबेयेसेस यांनी म्हटले आहे.

आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी भारतातून जादा लशींची निर्यात केली जाईल, असे जाहीर केले. अर्थात भारतातील नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे असून त्यानंतरच निर्यात केली जाईल, असे स्पष्ट केले. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक घ्रेबेयेसेस यांनी मंडावियांच्या घोषणेला टॅग करत म्हटले की, लस मैत्रीतंर्गत भारताने ऑक्टोबरमध्ये लस निर्यात करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मनसुख मंडाविया यांचे आभार. यावर्षाखेरीस सर्व देशांचे ४० टक्के लसीकरण करण्याचे ध्येय गाठण्यासाठी अशा प्रकारचा निर्णय हा महत्त्वाचा ठरणार आहे, असे घ्रेबेयेसेस यांनी म्हटले आहे.

भारताने यावर्षी एप्रिल महिन्यांत कोरोनाची दुसरी लाट आल्याने लसीची निर्यात थांबविली होती. जागतिक आरोग्य संघटना आणि गावी-व्हॅक्सिन अलायन्स हे दोघे एकत्र येऊन जगभरातील लसीचे वितरण निश्‍चित करण्याचे काम करत आहे. पण दुसरी लाटेने या संघटनेच्या उपक्रमाला मोठा धक्का बसला. आता आरोग्यमंत्री मंडाविया यांनी म्हटले की, एप्रिलच्या तुलनेत आता लसीचे दुप्पट उत्पादन होत आहे आणि पुढील महिन्यात हेच उत्पन्न चौपट होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()