केंद्र सरकारने कोरोना विषाणूच्या घटनांमध्ये झालेली घट आणि ओमिक्रॉन प्रकाराचा कमी धोका लक्षात घेऊन सोमवारपासून सर्व कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयात पूर्ण उपस्थिती पूर्ववत केली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह (Jitendra Singh) यांनी रविवारी सांगितले की, कोरोनाव्हायरस प्रकरणांची संख्या कमी झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
आज साथीच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. कोविड रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे तसेच सकारात्मकतेच्या दरात झालेली घसरण लक्षात घेता कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना सोमवारपासून कार्यालयात पूर्ण उपस्थिती पूर्ववत केली आहे. सोमवारी कोणतीही शिथिलता न ठेवता पूर्ण हजेरी सुरू होईल. ७ फेब्रुवारी २०२२ पासून सर्व कर्मचारी नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहतील, असेही जितेंद्र सिंह (Jitendra Singh) यांनी सांगितले.
विभाग प्रमुख हे सुनिश्चित करतील की कर्मचारी नेहमी मास्क घालतील आणि कोविड (coronavirus) नियमांचे पालन करतील. सोमवारपासून कोणताही कर्मचारी वर्क फ्रॉम होम (Central staff work from home closed) काम करणार नाही, असे सरकारने म्हटले आहे. कार्मिक मंत्रालयाने ३ जानेवारी रोजी जारी केलेल्या आदेशात म्हटले होते की, सचिव स्तरावरील ५० टक्के कर्मचाऱ्यांना ३१ जानेवारीपर्यंत वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी देण्यात आली होती. कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने हे करण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.