Same Sex Marriage: LGBTQ समाजाच्या प्रश्नांबाबत मोठा निर्णय! केंद्रानं घेतला महत्वाचा निर्णय

सेम सेक्स मॅरेज प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सध्या घडामोडी घडत आहेत.
LGBTQ
LGBTQsakal
Updated on

नवी दिल्ली : सेम सेक्स मॅरेज प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सध्या घडामोडी घडत आहेत. यावर कोर्टानं केंद्र सरकारला आपलं म्हणणं मांडण्याचे निर्देश दिले हेतो. त्यानंतर केंद्रानं महत्वाचा निर्णय घेतला असून LGBTQIA समाजाच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी विशेष समिती नेमण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. कॅबिनेट सेक्रेटरीच्या नेतृत्वाखाली ही समिती काम करणार आहे.

सेम सेक्स मॅरेज प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर सरकारची बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले, "सरकार याबाबत सकारात्मक आहे, माझ्या मित्रांनी (याचिकाकर्ते) LGBTQ समाजाला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे, याची माहिती मला द्यावी. याबाब नेमण्यात येणारी समिती शक्य ते आणि कायदेशीर तोडगा काढण्यासाठी यावर काम करेल.

LGBTQ
Supriya sule on Pathan: 'शाहरुखचा हेवा...'राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही 'पठाण'ची भुरळ...

ज्येष्ठ वकील ए. एम. सिंघवी यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली ते म्हणाले की, सरकारने केवळ प्रशासकीय बदल करण्याचं आश्वासन दिलं असल्यानं सुनावणी चालू ठेवावी. न्या. एस. रवींद्र भट म्हणाले, केंद्रानं 'प्रशासकीय' तोडगा तयार केला असला तरी यामध्ये मूलभूत बदल, अगदी कायद्यातील बदलांचाही विचार करावा लागेल.

दरम्यान, मेहता म्हणाले की, जे काही बदल कायदेशीररित्या परवानगी असतील ते केले जातील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.