Republic Day 2024 : 'रिपब्लिक डे'साठीचा दिल्ली, पंजाब अन् पश्चिम बंगालचा चित्ररथ रिजेक्ट का केला? केंद्र सरकारने दिलं उत्तर

दिल्ली, पश्चिम बंगाल आणि पंजाप या राज्याचे प्रजासत्ताक दिन परेडमधील चित्ररथ रिजेक्ट करण्यात आले आहेत.
centre clarification on rejection of delhi punjab and west bengal tableaux republic day 2024 parade marathi news
centre clarification on rejection of delhi punjab and west bengal tableaux republic day 2024 parade marathi news
Updated on

Republic Day Parade 2024 : दिल्ली, पश्चिम बंगाल आणि पंजाब या राज्याचे प्रजासत्ताक दिन परेडसाठीचे चित्ररथ रिजेक्ट करण्यात आले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाकडून या मुद्द्यावर केंद्र सरकार भेदभाव करत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान केंद्र सरकारकडून याबद्दल स्पष्टीकरण देत कोणत्याही राज्यासोबत भेदभाव केला नसल्याचे म्हटले आहे.

केंद्र सरकारने सांगितलं की, यावेळी व्यापक थीमवर आधारित चित्ररथांची निवड करण्यात आली आहे. कोणत्याही राज्यासोबत कुठल्याही प्रकारचा भेदभाव करण्यात आला नाही. निवड समितीमध्ये वेगवेगळ्या कलात्मक डोमेनचे लोक घेण्यात आले होते. त्यामुळे भेदभाव किंवा पूर्वग्रहातून हा निर्णय घेतल्याचा आरोप योग्य नाही, असे म्हटले आहे.

केंद्र सरकारने सांगितलं की, एक्सपर्ट कमेटीच्या अनेक बैठाकांच्या तीन राउंडमध्ये पंजाबच्या चित्ररथावर विचार केला गेला. मात्र शेवटच्या राउंडमध्ये थीमच्या आधारावर तो रिजेक्ट करण्यात आला. याच पद्धतीने पश्चिम बंगालचा चित्ररथ देखील अशाच कारणांमुळे नाकारण्यात आला, तो देखील थीमनुसार नव्हता. कला, संस्कृती, चित्रकला, संगीत, स्थापत्य, कोरियोग्राफी, शिल्पकला आणि इतर कला क्षेत्रातील तज्ज्ञांचा चित्ररथ निवडीच्या वेळी विचार करण्यात आल्याचे केंद्र सरकारने सांगितले.

centre clarification on rejection of delhi punjab and west bengal tableaux republic day 2024 parade marathi news
Lee Jae Myung Video : दक्षिण कोरियात विरोधी पक्षनेत्यावर चाकूने हल्ला; माध्यमांसमोरच गळ्यावर केले वार; पाहा व्हिडीओ

यावेळी देशातील 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी प्रस्ताव पाठवले होते. परंतु स्टँडर्ड थीमवर आधारित 15-16 चित्ररथ निवडले जातील. तसेच 23 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत लाल किल्ल्यावर होणार्‍या भारत पर्व कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ज्या राज्यांचे चित्ररथ निवडण्यात आलेली नाही त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

centre clarification on rejection of delhi punjab and west bengal tableaux republic day 2024 parade marathi news
घर पाडताना सापडलेल्या खजिन्यावर मजूरांचा डल्ला; सोन्याची 199 नाणी पळवली, पण...

आपचे गंभीर आरोप

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार हे आम आदमी पार्टी शासित राज्यांशी भेदभाव करत असल्याचा आरोप केला. मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, गतवर्षीप्रमाणे या वर्षीही प्रजासत्ताक दिनानिमित्त पंजाबचा चित्ररथ बाहेर ठेवण्याचे षडयंत्र भाजप सरकारने रचले आहे.

केंद्र सरकार पंजाबच्या जनतेविरुद्ध विषारी वर्तन करत आहे. भगवंत मान व्यतिरिक्त, दिल्ली सरकारचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज यांनी देखील केंद्र सरकारवर आम आदमी पार्टीच्या नेतृत्वाखालील पंजाब आणि दिल्ली सरकारला त्रास देण्याचा आणि दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. भारद्वाज म्हणाले की, दिल्ली आणि पंजाबला सातत्याने लक्ष्य केले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.