Aam Aadmi Party Arvind Kejriwal
Aam Aadmi Party Arvind Kejriwalesakal

Arvind Kejriwal: "सुप्रीम कोर्टाचा आदेश फिरवण्यासाठी केंद्राचं कट-कारस्थान सुरु"; केजरीवालांनी केला 'हा' मोठा दावा

प्रशासनातील एका घडामोडीवरुन केजरीवालांनी याबाबत गंभीर आरोप केला आहे.
Published on

नवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या सेवा नियुक्त्यांच्या विषयावर सुप्रीम कोर्टानं नुकताच ऐतिहासिक निर्णय दिला. यामध्ये केंद्रानं दिल्ली सरकारच्या विषयात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचं म्हटलं होतं. पण आता सुप्रीम कोर्टाचा हा आदेश फिरवण्यासाठी केंद्र सरकार कट-कारस्थान रचत असल्याचा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटद्वारे केला आहे. (Centre doing conspiracy to overturn SC order Arvind Kejriwal made big claim)

केजरीवालांनी ट्विट केलंय की, नायब राज्यपाल सुप्रीम कोर्टाचे आदेश का पाळत नाहीएत? दोन दिवसांपासून सर्व्हिसेस सेक्रेटरींच्या नियुक्तीच्या फाईल्सवर अद्याप सह्या का झालेल्या नाहीत? असा सवालही त्यांनी केला आहे.

Aam Aadmi Party Arvind Kejriwal
MVA Seat Sharing: मविआच्या जागा वाटपावर लवकरच निघेल तोडगा; पण...; पटोलेंची महत्वाची माहिती

असं सांगितलं जातंय की, केंद्र सरकार पुढच्या आठवड्यात अध्यादेश आणून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला पलवटवणार आहे का? केंद्र सरकार सुप्रीम कोर्टाचा आदेश पलवटवण्याचं कट-कारस्थान करत आहे का? नायब राज्यपाल या अध्यादेशाची वाट पाहत आहेत का? त्यामुळंच ते फाईलवर सही करत नाहीएत? असे प्रश्न केजरीवाल यांनी विचारले आहेत.

Aam Aadmi Party Arvind Kejriwal
Sameer Wankhede : 'सेक्स पिल्स घेतल्यानंतर...' वानखेडेंचे व्हाट्स अप चॅट व्हायरल

केजरीवालांचे आरोप गंभीर

केजरीवालांनी केंद्र सरकार आणि दिल्लीच्या नायब राज्यपालांवर केलेले आरोप गंभीर आहेत. कारण सुप्रीम कोर्टानं नुकतेत दिल्ली सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संघर्षावरुन निर्माण झालेल्या एका प्रकरणात निकाल देताना केंद्र सरकारला फटकारलं होतं. तसेच राज्यपालांना राज्य सरकारच्या अधिकारक्षेत्रात घुसखोरी करण्याचा अधिकार नसल्याचं म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()