मोठी बातमी! कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका; केंद्र सरकारकडून राज्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

केरळमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झालेला पहिला रुग्ण आढळून आला आहे. त्यानंतर केंद्र सरकार अलर्ट झालं आहे. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राज्यांसाठी खबरदारीच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
Corona virus alters proteins in the sperm cells thereby affecting fertility
Corona virus alters proteins in the sperm cells thereby affecting fertilitysakal
Updated on

नवी दिल्ली- केरळमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झालेला पहिला रुग्ण आढळून आला आहे. त्यानंतर केंद्र सरकार अलर्ट झालं आहे. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राज्यांसाठी खबरदारीच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. (Centre issues advisory to states after first case of new coronavirus variant)

केरळमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट JN.1 आढळून आला आहे. तिरुवनंतपुरतमधील एका ७९ वर्षीय महिलेला या विषाणूची लागण झाली आहे. येणारे काही दिवस सण-उत्सवांचे आहेत. त्यामुळे विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी काही खबरदारी घेण्याची गरज आहे, असं केंद्र सरकारच्या सूचनेमध्ये म्हणण्यात आलं आहे.

Corona virus alters proteins in the sperm cells thereby affecting fertility
Corona Warriors : राज्यातील ४० हजार कोरोना योद्धे वाऱ्यावर; राज्य सरकारचा काणाडोळा

केंद्र सरकारच्या सूचनेमध्ये सांगण्यात आलंय की, जिल्हा पातळीवर रुग्णांचे सर्व्हेक्षण केलं जावं. यातील सर्दीसारखा आजार, श्वास घेण्यास अडचण अशा रुग्णांची ओळख करावी. सर्व जिल्ह्यांमध्ये आवश्यक टेस्टिंग कीट असल्याची खात्री करण्यात यावी.

कोरोना JN.1 व्हेरियंट हा पिरोलाचा भाऊबंध असल्याचं सांगितलं जातं. याचा पहिला रुग्ण अमेरिकेमध्ये सप्टेंबर २०२३ मध्ये आढळून आला होता. त्यानंतर चीनमध्ये डिसेंबर महिन्यात या विषाणूची लागण झालेले ७ रुग्ण आढळून आले होते.

Corona virus alters proteins in the sperm cells thereby affecting fertility
Corona Update : केरळमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ! कर्नाटकात सरकारचा ज्येष्ठांना मास्क घालण्याचा सल्ला

कोरोना JN.1 व्हेरियंट तसा सौम्य आहे. यामुळे काळजी करण्याची गरज नसल्याचं वैज्ञानिक सांगतात. सौम्य ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास, सर्दी, अंगदूखी, डोकेदुखी अशा प्रकारचे लक्षणं या विषाणूमुळे जाणवू शकतात. विषाणूच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने त्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. (Latest Marathi News)

केरळमध्ये पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर कर्नाटक सरकार देखील अलर्ट मोडमध्ये गेला आहे. राज्याने वयस्कर नागरिकांसाठी मास्क घालण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. तसेच केरळ-कर्नाटक सीमेवरुन प्रवासावर काही निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या सूचना जारी झाल्यानंतर राज्य सरकारला आवश्यक त्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.