कोविशील्डच्या दुसऱ्या डोससंदर्भात केंद्राचा मोठा निर्णय

परदेशात शिकण्यासाठी जाणाऱ्या मुंबईतील विद्यार्थ्यांना लसीकरणासाठी वॉक-इन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Covishield
CovishieldGoogle file photo
Updated on
Summary

परदेशात शिकण्यासाठी जाणाऱ्या मुंबईतील विद्यार्थ्यांना लसीकरणासाठी वॉक-इन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : परदेशात जाणाऱ्या विद्यार्थी, व्यावसायिक तसेच खेळाडूंना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाचे नियम बदलले आहेत. याबाबत केंद्र सरकारने सोमवारी (ता.७) एक सविस्तर मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केली आहे. केंद्राने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये असे म्हटले आहे की, जर एखादी व्यक्ती परदेश दौर्‍यावर जाणार असेल, तर अशा परिस्थितीत कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस २८ दिवसानंतर कधीही दिला जाऊ शकतो. सध्या कोविशिल्डचा दुसरा डोस ८४ दिवसांनी घेण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. (centre issues SOPs for second dose of Covishield who going abroad)

केंद्राच्या नवीन एसओपीमध्ये असे म्हटले आहे की, परदेशी प्रवासासाठी कोविशील्ड लस घेतलेल्यांना लस प्रमाणपत्र देण्यात येईल. लसीकरण प्रमाणपत्रात पासपोर्ट क्रमांकाचा उल्लेख करणे अनिवार्य आहे. ही सुविधा १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी आहे, ज्यांना ३१ ऑगस्टपर्यंत परदेशात जाण्याची इच्छा आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या नवीन एसओपीमध्ये असे म्हटले आहे की, परदेश प्रवास करणाऱ्यांसाठी विशेष व्यवस्था लवकरच कोविन अॅपवर उपलब्ध करून देण्यात येईल.

Covishield
मुळशी अग्निकांड: PM निधीतून मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत

कुणासाठी आहे ही नवी यंत्रणा :

- जे विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जाणार आहेत.

- परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या लोकांसाठी.

- टोकियो ऑलिम्पिक अॅथलीट्स, खेळाडू तसेच खेळाडूंसोबत जाणार्‍या कर्मचारीसाठी.

नवीन प्रणालीनुसार कोविशील्डच्या दोन डोसमध्ये कमीतकमी ८४ दिवस (१२-१६ आठवडे) अंतर असणे बंधनकारक आहे, पण परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थी, नोकरदार आणि खेळाडूंना सूट देण्यात येईल. पहिला डोस घेऊन २८ दिवस झाले असतील, तरच त्यांना दुसरा डोस देण्यात येणार आहे.

Covishield
CBSE : बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा होणार ऑनलाईन

दरम्यान, परदेशात शिकण्यासाठी जाणाऱ्या मुंबईतील विद्यार्थ्यांना लसीकरणासाठी वॉक-इन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वॉक-इनअंतर्गत विद्यार्थ्यांना आठवड्याच्या सुरुवातीच्या तीन दिवसांत कस्तुरबा, राजावाडी आणि कूपर रुग्णालयात लस दिली जाऊ शकते. त्यासाठी त्यांना प्रवेश आणि व्हिसाची कागदपत्रे द्यावी लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.