अनलॉकींग 'सावधपणे' व्हावं; केंद्राची राज्यांना सूचना

nashik unlock
nashik unlockesakal
Updated on

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आज शनिवारी राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. केंद्राने राज्यांना म्हटलंय की, राज्यांनी कोरोना लॉकडाऊननचे नियम शिथिल करताना काळजी बाळगावी. अनलॉकची प्रक्रिया राबवताना कोरोनाच्या नियमांची अंमलबजावणी, तपासणी-उपचार आणि लसीकरणासारख्या 'खूपच महत्त्वपूर्ण' अशा पाच बाबींचा अवलंब कटाक्षाने करावा.

nashik unlock
जम्मू-काश्मीर: महत्त्वाची राजकीय घडामोड; केंद्राने बोलावली सर्वपक्षीय बैठक

सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबतच्या सुचना पाठवण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी म्हटलंय की, संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी सध्य परिस्थितीमध्ये कोरोना लसीकरणाची मोहिम अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांनी पुढे म्हटलंय की, राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी लसीकरणाची गती आणखी वाढवायला हवी.

गृह सचिवांनी पुढे म्हटलंय की, दुसऱ्या लाटेदरम्यान अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये संक्रमणाच्या प्रकरणांमदध्ये उल्लेखनिय वाढ झाल्याचं पहायला मिळालं होतं त्यामुळे अनेक राज्यांनी संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंध लागू केले होते.

nashik unlock
येडीयुरप्पा,पाटलांच्या बैठकीत कर्नाटकसाठी महत्वाचा निर्णय

पुढे त्यांनी म्हटलंय की, संक्रमणामध्ये घट झाल्यामुळे अनेक राज्यांनी तसेच केंद्रशासित प्रदेशांनी प्रतिबंध शिथील करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या परिस्थितीत मी हे अधोरेखित करु इच्छितो की अनलॉकींगची प्रक्रिया ही अत्यंत सावधानतेने, सजगतेने आणि प्रत्यक्षातील परिस्थितीच्या आकलनानुसार केली जावी.

भल्ला यांनी म्हटंलय की, काही राज्यांमध्ये नियम शिथिल केल्यानंतर कोरोना नियमावलीची पायमल्ली करत बाजारांमध्ये तसेच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर नेहमीसारखीच गर्दी दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.